(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अपडेट, अखेर दोन महिन्यांनी लाडोबाने 300 शब्दांचा लिहिला निबंध!
Pune Porsche Accident : अल्पवयीने मुलाने 300 शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे. मुलाचे आई- वडिल अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरातील (Pune Porsche Accident) कल्याणीनगर अपघाताच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हळहळला. पोर्शे कारच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिल्डरपुत्राची अवघ्या 15 तासात सुटका झाली. आरोपीला या प्रकरणात निबंध लिहिण्यासारख्या अन्य काही किरकोळ अटींवरुन जामीन मिळाला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर दोन महिन्यानंतर लाडोबाने निबंध सादर केला आहे.
अल्पवयीन बिल्डरपुत्राची काही दिवसापूर्वी बालसुधारगृहातून सुटका करण्यात आली. सुटका करताना त्यावेळी त्याला काही अटी शर्थी घालून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्याने 300 शब्दचा निबंध लिहून देण्याची अट होती. या निंबधामध्ये अपघात घडल्यनंतर काय करायले हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यावी या पद्धतीचा निबंध लिहणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने 300 शब्दांचा निंबध बालहक्क मंडळकडे वकिलांच्यामार्फत सादर केला आहे. मुलाचे आई- वडिल अजूनही इतर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.
'निबंध' लिहिण्याचा अटीवर मिळाला जामीन
पोलिसांनी आरोपी युवकाला बालहर्क मंडळासमोर हजर केले, याठिकाणी त्याला जामीन मिळाला. याशिवाय रस्ते अपघात आणि त्यावर उपाय या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे त्याला आदेश देण्यात आले.दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांमध्येच त्या अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. त्यामुळे नागरिकांतून एक प्रकारची नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा नवीन कलम लावलं आणि त्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला.
नेमका अपघात कसा घडला?
वेदांत अगरवाल हा रविवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला.
हे ही वाचा :
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....