एक्स्प्लोर
आदर्श सोसायटी जमीनदोस्त करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई : मुंबईतील बहुचर्चित आदर्श इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. पर्यावरण नियमांचं उल्लंघन करुन ही इमारत बांधलीच कशी, असा सवालही यावेळी हायकोर्टानं केला. त्याचबरोबर या कारवाईसाठी 12 आठवड्यांची म्हणजे 3 महिन्यांची स्थगिती दिली आहे. या 12 आठवड्यांमध्ये आदर्श सोसायटीचे मेंबर सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. त्यामुळं आदर्श पाडण्याचे हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. आदर्श सोसायटी घोटाळ्यातील राजकीय नेते, मंत्री आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेशही मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले. वादग्रस्त आदर्श सोसायटीची इमारत पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असून बेमुर्वतखोरपणे संपत्ती गोळा करणारे राजकारणी व नोकरशहा यांना हा तडाखा आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी आदेशाचे स्वागत केले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























