एक्स्प्लोर
मोहरमच्या जुलूसमध्ये लहान मुले नकोत: हायकोर्ट
![मोहरमच्या जुलूसमध्ये लहान मुले नकोत: हायकोर्ट Mumbai High Court Directs Acp South To Ensure Childrens Safety During Muharram मोहरमच्या जुलूसमध्ये लहान मुले नकोत: हायकोर्ट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/02123835/Mumbai-highcourt-660x400.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मोहरम दरम्यान निघणाऱ्या मातमच्या जुलूसमध्ये लहान मुलांच्या समावेशावर बंदी यावी असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. यासंदर्भात शिया पंथीय आयोजकांनीच सकारात्मक निर्णय घ्यावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात दाखल सुमोटो याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टानं हे मत व्यक्त केलं.
तसेच दक्षिण मुंबईतील अतिरिक्त पोलिस आयुक्तांना या मिरवणुकांच्या आयोजकांशी चर्चा करून यासंदर्भात तोडगा काढावा असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
यंदा सप्टेंबरमध्ये मोहरम आहे. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने पोलिसांना हा सल्ला दिला आहे.
मोहरमनिमित्तानं दरवर्षी दक्षिण मुंबईत भेंडी बझार ते भायखळा अशी रस्त्यावरुन मातमची मिरवणूक निघते. ज्यात अबालवद्ध मुस्लिम बांधव स्वत:च्या शरीरावर वार करून जखमा करून घेतात. पाहणाऱ्याला हे दृश्य फार विदारक असतं आणि त्यात लहान मुलांचाही सहभाग मोठ्या संख्येने असल्याने त्याची तीव्रता आणखीनच जाणवते.
त्यामुळे अज्ञान मुलांनी तरी निदान यात सहभागी होऊ नये अशी अपेक्षा न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने व्यक्त करत 3 आठवड्यांकरता या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)