Video: आमदारकी गेली खड्ड्यात, मुंबई, ठाण्यासह पुणेही जाम करू; ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा, जरांगेंनाही टोला
आमदारकी गेली खड्ड्यात वड्डेटीवार कसलीही परवा करणार नाही. राजकारणापलिकडे जाऊन जो कोणी आपला घात करेल, त्याचा घात करण्याची तयारी ठेवा.

नागपूर : राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणातील(OBC reservation) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वात नागपूर (Nagpur) येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून ओबीसी समाजाने सरकारला इशारा दिला असून 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकरांची आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनीही मोर्चातील भाषणातून सरकारला इशारा दिला आहे. येथे ओबीसींच्या आजच्या ऐतिहासिक मोर्चा मध्ये 371 जाती आहेत, आणि दुसरीकडे मराठा एक जात आहे. जे 56 टक्के त्यांना 27 आरक्षण आणि 15 टक्के लोकांना 48 टक्के आरक्षण ही चाणक्यनिती आहे. राज्यातील 15 टक्क्याचं सरकार हे तुमच्यात भांडण लावण्याचं काम करत आहे. 2 सप्टेंबर रोजी काढलेला जीआर वाचल्यावर एका जरांगेच्या भरवश्यावर तुम्ही निवडून आलात काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.
आमदारकी गेली खड्ड्यात वड्डेटीवार कसलीही परवा करणार नाही. राजकारणापलिकडे जाऊन जो कोणी आपला घात करेल, त्याचा घात करण्याची तयारी ठेवा. सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द न केल्यास पुणे-मुंबई जाम करू, असा इशाराही सरकारला दिला. माझा डीएनए ओबीसी आहे, तुमचा ओबीसी असेल तर ओबीसींच्या गळ्यावर सुरी का फिरवत आहात. सुधारून जा नाहीतर तुमची जागा दाखवणार, असा इशाराच सरकारला दिला आहे. आमदारकी खड्ड्यात गेली, आमच्यावर अन्याय होत असेल तर वड्डेटीवार कसली परवा करणार नाही. सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द न केल्यास त्यांनी केवळ मुंबईत मोर्चा काढला, आम्ही मुंबई पुण्यासह ठाणेही जाम करू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महायुती सरकारला दिला आहे.
संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे (maratha samaj in OCB)
केंद्राच्या आर्थिक निकषावरील म्हणजेच EWS आरक्षणामध्ये 10 टक्के आरक्षण आहे, त्यापैकी साडे आठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतो आहे. या बैताड जरांगेला हे कळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी त्यांना भेटायला गेलो, आता माझा व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. 4 हजार 300 नोंदी असणाऱ्या बांधवांना आरक्षण द्यावे ही आमची भूमिका होती. परंतु, 2 लाख 40 प्रमाणपत्र वाटल्या गेली आहेत, आज संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे. मराठा समाज आला तर उपवर्गीकरण करण्याचे काम सरकार करेल. सरकारने याच्यापुढे नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले तरी ते ओबीसी मध्ये पात्र होणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसीच्या हातात घंटा देणार, मग तुम्हाला घंटा वाजायचे काम राहील, असे वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
सरकारने ओबीसीतील घुसकोरी थांबवावी, अन्यथा सरकारला थांबवू
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत असेल तर आमचा विरोध नाही, कोणत्याही परिस्थितीत हा रद्द व्हावा अशी आमची मागणी आहे. हा मोर्चा फक्त झाकी आहे, काहीही झालं तरी ओबीसीमधील घुसखोरी थांबवू, सरकार थांबवत नसेल तर सरकारला थांबवू, असा इशाराही वडेट्टीवारांनी महायुती सरकारला दिला. धनगर समाजात फूट पाडली, ओबीसीमध्ये फूट पाडली, ही पाळी आज आपल्यावर आणली. आरक्षण नको हीच ह्यांची विचारधारा आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.






















