एक्स्प्लोर
Advertisement
सीएसएमटी पादचारी पुलाच्या जन्मापासून आजपर्यंतची कहाणी
सहा जणांसाठी हा पूल काळ बनून आला. या पुलाच्या बांधकामानंतर प्रशासनाने आजपर्यंत अनेकदा हलगर्जीपणा केला आहे. त्याचंच पर्यवसान दुर्घटनेत झालं.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा सहावर पोहचला आहे. पूलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघी महिला जीटी हॉस्पिटलच्या कर्मचारी होत्या.
या पुलाचं वय होतं अवघं 31 वर्ष, म्हणजेच कोसळावा एवढा तो जीर्ण झाला नव्हता. जेडी देसाई कन्सल्टंटने पुलाच्या पाहणीत मोठी चूक केली आणि तो धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला. त्याचा परिणाम गुरुवारी रात्री पाहायला मिळाला. सहा जणांसाठी हा पूल काळ बनून आला. या पुलाच्या बांधकामानंतर प्रशासनाने आजपर्यंत अनेकदा हलगर्जीपणा केला आहे. त्याचंच पर्यवसान दुर्घटनेत झालं.
सीएसएमटी पादचारी पुलाच्या जन्मापासून आजपर्यंतची कहाणी
- 1988 मध्ये हा पाचदारी पूल बांधण्यात आला. या पुलाची जबाबदारी महापालिकेचीच आहे.
- 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार अजमल कसाब याच पुलावरुन सीएसएमटी स्टेशनवरुन कामा रुग्णालयाकडे आला होता. नंतर या पुलाला कसाब पूल आणि दवळच्या गल्लीला कसाब गल्ली नाव पडलं. स्थानिक आणि प्रवाशांनीच हे नाव दिलं होतं.
- 2016 मध्ये या पुलाची किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटी झाली.
- यानंतर 2017 मध्ये पुलाची पाहणी झाली. जेडी देसाई कन्सल्टंटने हा पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा दिला होता. पण जेडी देसाई कन्सल्टंटची ही सर्वात मोठी चूक ठरली
- डिसेंबर 2018 मध्ये छोट्यामोठ्या दुरुस्तीची निविदा काढण्यात आली.
- हे टेंडर आजही स्थायी समितीत प्रलंबित आहे. टेंडर वेळेत मंजूर झालं असतं कर काम सुरु होऊन दुरुस्तीदरम्यान तरी पूल धोकादायक झाला आहे, हे लक्षात आलं असतं.
- गेल्या आठवड्यात आचारसंहिता लाहू होण्याच्या आधी स्थायी समितीच्या तीन बैठका झाल्या. अगदी काही मिनिटांमध्ये चर्चेशिवाय 1200 कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले.
- मात्र, निवडणुकीच्या तोंडावर केवळ फायदेशीर प्रस्ताव मंजूर करुन घेण्याकडेच लक्ष देण्यात आलं. दुर्दैवाने या पुलाच्या कामाचं टेंडर त्यात नव्हते.
- परिणामी, सहा जणांना आपल्या कवेत घेऊन या धोकादायक पुलाचा काही भाग जमीनदोस्त झाला.
VIDEO : मुंबई पूल दुर्घटना, कोसळण्यापूर्वी आणि कोसळल्यानंतर |
संबंधित बातम्या
मुंबई पूल दुर्घटना : 'लोकांनी व्हिडीओ बनवण्याऐवजी मदत केली असती तर माझा भाऊ वाचला असता'
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी
सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे
बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका
पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप
'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे
रेड सिग्नलमुळे अनेक जीव वाचले, सिग्नल असल्याने वाहतूक थांबली, मोठी जीवितहानी टळली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement