Mumbai Fire: मालाडचं फर्निचर मार्केट बेचिराख, 70 ते 80 दुकानं जळून खाक, 4 तासांनंतरही अग्नितांडव सुरुच
Mumbai Malad Fire: ही आग वेगाने पसरत असून त्यामुळे आकाशात काळ्या धुराचा प्रचंड लोट उठल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चार ते पाच तासांपेक्षा जास्त ही आग सुरूच आहे.
मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये (Malad News) शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी (Dindoshi News) या परिसरामध्ये असलेल्या असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी एका गोदामात लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. ही आग वेगाने पसरत असून त्यामुळे आकाशात काळ्या धुराचा प्रचंड लोट उठल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या चार ते पाच तासांपेक्षा जास्त ही आग सुरूच आहे. (Fire in Mumbai)
दिंडोशीती आग तब्बल चार तास होऊन गेले तरी अद्याप आटोक्यात आली नाही, अद्याप ही धगधगती आग सुरू आहे,आत्तापर्यंत आगीच्या भक्षस्थानी 70 ते 80 फर्निचर आणि कापडाच्या दुकाने जळून खाक झाली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात लाकडाची गोदामे आहेत. काही दुकानदारांनी आपला फर्निचरच्या सामान रस्त्यावर ठेवल्यामुळे फिल्मसिटी जंक्शन ते रहेजा पर्यंत मुख्यमार्ग बंद करण्यात आला आहे.
आगीमध्ये आपल्या दुकानातील सामान जळू नये म्हणून काहींनी दुकाने रिकामी केली असून सर्व सामान रस्त्यावरती आणून ठेवलं आहे. यामुळे संपूर्ण मार्ग बंद करण्यात आला आहे. बागेश्वरी ते आयटी पार्कला जाणारा मुख्य मार्ग मागील चार तासापासून बंद आहे. मोठ्या प्रमाणात या भागात पत्र्याची घरे आहेत, यात लाकूड आणि कपड्यांचे साठा ठेवण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावर फर्निचरच्या साठा ठेवल्याचे दिसून येत आहे. हा फर्निचरच्या साठा ठेवल्यामुळे मुख्य बंद करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
आज(शनिवारी, 25) सकाळी 11 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अग्मिशमन दलाच्या (Fire brigade) चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागलेल्या भागात आजुबाजूला मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरली. या पार्श्वभूमीवर सध्या दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूचा परिसर रिकामा केला जात आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत फर्निचरची गोदामं जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तब्बल चार तासांनंतरही अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.