एक्स्प्लोर
मुंबईत दरोड्याच्या उद्देशाने वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा संशय
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातील एकता डिलाइट या इमारतीत राहणाऱ्या मखिजा दाम्पत्याची हत्या झाली

प्रातिनिधीक फोटो
मुंबई : मुंबईत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरोड्याच्या उद्देशाने दोघांची हत्या झाल्याचा संशय आहे.
एकटं राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा निर्माण झाला आहे.
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातील एकता डिलाइट या इमारतीत मखिजा दाम्पत्य राहत होतं. आज सकाळी 85 वर्षीय नानक मखिजा आणि त्यांच्या 81 वर्षीय पत्नी दया मखिजा यांचे मृतदेह आढळले.
दोघांची काल रात्री हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरोड्याच्या उद्देशाने मखिजा दाम्पत्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
