एक्स्प्लोर
विस्टाडोम कोच जोडलेली जनशताब्दी दादरहून मडगावला रवाना
भारतीयांप्रमाणेच परदेशी पाहुण्यांचा रेल्वेचा प्रवास आणखी सुखकर व्हावा आणि पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली.

फोटो सौजन्य : भारतीय रेल्वे
मुंबई : अत्यंत आधुनिक आणि आलिशान असणारा विस्टाडोमचा एक डबा आज कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. ही गाडी मुंबईतील दादर स्थानकावरुन मडगावच्या दिशेने रवाना झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पारदर्शक डबा असलेली ही गाडी रुळांवर धावत आहे. विस्टाडोम डब्याचं तिकीट विमान प्रवासाइतकंच आहे. तुम्हाला या डब्यातून मुंबई ते गोवा प्रवासासाठी दोन हजार 325 रुपये मोजावे लागतील.
विस्टाडोमचे पारदर्शक डबे लवकरच जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडणार
भारतीयांप्रमाणेच परदेशी पाहुण्यांचा रेल्वेचा प्रवास आणखी सुखकर व्हावा आणि पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली. एप्रिलमध्ये या ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भुवनेश्वरमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या ट्रेनचं लोकार्पण केलं. विस्टाडोम कोचची वैशिष्ट्यं काय? पारदर्शी छत, मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने प्रवास करताना एक वेगळा अनुभव मिळू शकतो. शिवाय फिरणाऱ्या खुर्च्या, जी. पी. एस यंत्रणा, ऑटोमॅटिक दरवाजे, एलसीडी यांसह अनेक सोयी सुविधा आहेत. कोकणवासियांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी तेजस एक्स्प्रेसनंतर विस्टाडोमच्या रुपानं नवं गिफ्ट मिळालं आहे. संबंधित बातम्या VIDEO : मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच सहभागी होणारी विस्टाडोम कोच ट्रेन कशी आहे? रेल्वे प्रवास अजून सुखावणार, भारतीय रेल्वेची 'विस्टाडोम कोच' ट्रेन सुरुआणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























