(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Cruise Drug Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या SET नं तपास तुर्तास थांबवला; सूत्रांची माहिती
Mumbai Cruise Drug Case : देशभरात गाजलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांच्या SET नं तपास तुर्तास थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai Cruise Drug Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा मुंबई पोलीस SET (Special Enquiry Team) तयार करुन तपास करत होते. परंतु आता मुंबई पोलिसांनी चौकशी तुर्तास थांबवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.
मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अनेकदा समन्स बजावल्यानंतरही बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही. तसेच मुंबई पोलीस एनसीबीच्या विजेलंस टीमच्या तपासाच्या अहवालाची वाट पाहत आहेत.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पूजा ददलानीनं आपल्या प्रकृतीची सबब देत पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर राहणं टाळलं. मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यातच मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आरोप-प्रत्यारोप समोर आल्यानंतर तपास करण्यासाठी SET स्थापन केली होती. तसेच याप्रकरणी कायदेशीर सल्लाही दिला होता. पण या प्रकरणात जोपर्यंत पूजा ददलानी आपला जबाब नोंदवत नाही, तोपर्यंत मुंबई पोलिसांना FIR दाखल करता येणार नाही. पोलिसांनी सांगितलं की, पूजाला SET कोणत्याही प्रकारचा दबाव टाकून चौकशीसाठी बोलावू शकत नाही. कारण SET केवळ चौकशी करत आहेत, ते कोणत्याही FIR चा तपास करत नाहीत. परंतु, पूजा ददलानीनं अद्याप जबाब नोंदवला नसल्यानं SET चा तपास अद्याप पुढे जात नाहीये. त्यामुळे SET ने काही काल तपास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cruise Drugs Case) बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. परंतु, तेव्हापासूनच या प्रकरणात दररोज नवनवे गौप्यस्फोट होत होते. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले होते. ड्रग्जचं प्रकरण थेट खंडणी आणि वसुलीपर्यंत पोहोचलं होतं. एवढंच नाहीतर या प्रकरणामुळे राज्यासह देशातील राजकारणंही चांगलंच तापलं होतं. सध्या आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरुच आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aslam Shaikh on Mumbai Cruise Drugs Case : मला क्रूझ ड्रग्ज पार्टीचं निमंत्रण होतं, पण.... : अस्लम शेख
- Aryan Khan case : आर्यन खान प्रकरण घडवून आणलं; साक्षीदार विजय पगारेंचा दावा
- आर्यन खान प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात? मुंबई पोलीस चौकशी करणार!
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा