एक्स्प्लोर

आर्यन खान प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात? मुंबई पोलीस चौकशी करणार!

Mumbai Drugs case : मुंबई पोलिसांकडून मुंबई ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

Aryan Khan case  मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले होते. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

मुंबई हायकोर्टाने आर्यन खान आणि इतर काही आरोपींना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर केला होता.   आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसेच या प्रकरणात एनसीबीकडून ज्या व्हॉट्सअप चॅटचा पुरावा म्हणून आधार घेण्यात आलं होते त्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीही नसल्याचं 28 ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटले होते. 

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या कारवाईत भाजपशी संबंधित लोक असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणातील एक पंच किरण गोसावी याच्यावरही गु्न्हे दाखल असून तो फरार असल्याचे समोर आले होते. नवाब मलिक यांच्याकडून आरोप सुरू असताना दुसरीकडे  या प्रकरणाशी निगडित असलेल्या काही जणांकडूनही गौप्यस्फोट करण्यात येत होते. आर्यन खानवर झालेली कारवाई ही खंडणीसाठी झाल्याचाही आरोप होऊ लागला होता. 

हायकोर्टाने जामीन निकालपत्रात काय म्हटले?

आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, तर आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. ड्रग्ज अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी 28 ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयानं केलीय. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नाही असं देखील कोर्टानं म्हटलंय.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Aryan Khan case : आर्यन खान प्रकरण घडवून आणलं; साक्षीदार विजय पगारेंचा दावा

ज्ञानदेव वानखेडेंना दिलासा नाहीच, नवाब मलिकांना वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखण्यास कोर्टाचा नकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं,  एक नव्हे तर चार घरं लाटली
माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
Yuzvendra Chahal Post: 'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratap Sarnaik Dharashiv : पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1 PM 20 February 2025Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, 1995 मधील प्रकरण अंगलटDelhi Parvesh Verma Oath Taking : प्रवेश वर्मा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल
Manikrao kokate: माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं,  एक नव्हे तर चार घरं लाटली
माणिकराव कोकाटेंना 28 वर्षांनी ते 'पाप' फेडावं लागलं, एक नव्हे तर चार घरं लाटली
Yuzvendra Chahal Post: 'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
'Thank You God'; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची आणखी एक खळबळजनक पोस्ट
जळगाव जिल्ह्यात देशातील पहिलाच अनोखा प्रयोग, नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद
जळगाव जिल्ह्यात देशातील पहिलाच अनोखा प्रयोग, नागरिकांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद
मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रि‍पदाची शपथ
मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रि‍पदाची शपथ
Fact Check : जसप्रीत बुमराह रुग्णालयात आराम करत असल्याचा फोटो व्हायरल,फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : जसप्रीत बुमराहचा 'तो' फोटो पाहून अनेकांना धक्का, रुग्णालयातील फोटोचं सत्य फॅक्ट चेकमध्ये समोर
Shaktipeeth Expressway : 'शक्तीपीठ' महामार्गाविरोधात एल्गार! 12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार
'शक्तीपीठ' महामार्गाविरोधात एल्गार! 12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.