एक्स्प्लोर

वसुलीसाठी मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच किरण गोसावीनं स्वतःला एनसीबी अधिकारी सांगितलं : मुंबई पोलीस SIT

Mumbai Cruise Drug Case : किरण गोसावीनं शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीला आपण एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत, वसुली केल्याचं मुंबई पोलीस SIT च्या तपासात स्पष्ट झालं आहे.

Mumbai Cruise Drug Csae : क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर NCB सह वैयक्तिक पंचांवर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचा तपास मुंबई पोलिसांची SIT करत आहे. काही लोकांनी NCB च्या नावाचा वापर करुन वसुली केली, असं तपासादरम्यान, SIT च्या निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी प्रभाकर साईलनं मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्यानं याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. 

मुंबई पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे. अनेक खाजगी गुप्तहेरांनी आपण एनसीबीचे अधिकारी आहोत, असं भासवलं. तसेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला विश्वास दिला की, ते आर्यन खानला या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढू शकतील. 

मुंबई पोलिस याच तपासाच्या पार्श्वभूमीवर केपी गोसावी (Kiran Gosavi) विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परंतु, त्यासाठी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब नोंदवण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पूजाला पोलिसांनी शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृतीची सबब देत पूजानं मुंबई पोलिसांकडे वेळ मागितला आहे. दरम्यान, पोलिसांनी पूजा ददलानीला लवकरात लवकरत आपला जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावीनं स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं भासवलं. यामागे पूजा ददलानीला विश्वासात घेण्याचाच मूळ हेतू होता. त्याबदल्यात आर्यनला सोडून पैसे उकळण्याचा कट होता. 

मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणी ददलानीनं तक्रार दाखल करणं गरजेचं आहे. कारण तिनंच किरण गोसावीला पैसे दिले होते. त्यावेळी चिक्की पांडेही उपस्थित होता. त्यामुळे चिक्की पांडेलाही चौकशीसाठी पोलिसांनी समन्स बजावलं आहे. दरम्यान, चिक्की पांडेला कोरोना झाल्यामुळं तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. 

पूजा ददलानी आणि किरण गोसावीमध्ये काय बोलणं झालं? 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परळ परिसरात पूजा ददलानीशी बोलताना किरण गोसावीनं आर्यन खानचे काही फोटो दाखवले होते आणि आर्यन खानची एक ऑडिओ क्लिपही ऐकवली होती. दरम्यान, ही तिच ऑडिओ क्लिप आहे, ज्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी ट्वीट केला होता. ज्यामध्ये किरण गोसावी ऑफिसमध्ये बसून आर्यन खानचं फोनवरुन कोणाशीतरी बोलणं करुन देत होता. 

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप मुंबई पोलिसांना तपासात एनसीबीचा कोणताही सहभाग असल्याचं आढळून आलेलं नाही. या प्रकरणात किरण गोसावी विरोधात अनेक महत्त्वाचे धागेदोरे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

प्रभाकर साईल कोण? काय आहे त्यांचा दावा? 

सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी दिली आहे. मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो.  क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.11.30 दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेलं बघितलं. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावलं. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यानं मला ब्लॅंक पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅंक पेपरवर कश्या सह्या करु असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले आणि म्हणाले काय नाही होत तू कर सह्या. मी सह्या केल्या. 9 ते 10 ब्लॅंक पेपरवर मला सह्या करायला लावल्या. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉटसअप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लॅंक होते, असं साईल यांनी सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget