एक्स्प्लोर

Aryan Khan Released : 'या' 14 अटींचं पालन करणं बंधनकारक, अन्यथा आर्यन खानचा जामीन होऊ शकतो रद्द

Aryan Khan Released : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची अखेर आज जामीनावर सुटका झाली आहे. पण जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयानं काही

Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची अखेर आज जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. सुटका झाल्यानंतर आर्यन खान आपल्या घरी मन्नतच्या दिशेनं रवाना झाला. दरम्यान, आर्यन खानला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयानं 14 अटी घातल्या आहेत. ज्यांचं पालन आर्यनला करावं लागणार आहे. जर अटींचं पालन आर्यननं केलं नाही तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. 

... या 14 अटी 

1. आर्यन खानला एक लाख रुपयांचा पर्सनल बाँड भरावा लागणार आहे. 
2. अशाप्रकारच्या कोणत्याही प्रकरणात पुन्हा सहभागी न होण्याची हमी आर्यनला द्यावी लागणार 
3. या प्रकरणातील कोणत्याही आरोपींसोबत संपर्क साधायचा नाही. 
4. असं कोणतंही काम करु नये, ज्यामुळं त्यांच्यावरील आरोपांवर फरक पडेल. 
5. साक्षीदार किंवा पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये
6. पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश
7. माध्यमांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यास मनाई 
8. उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडण्यास मनाई 
9. आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक
10. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार 
11. कोर्टाच्या प्रत्येक सुनावणी वेळी उपस्थित राहावं लागणार आणि तपासात पूर्ण सहकार्य करणं गरजेचं 
12. प्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर चौकशीला विलंब करु नये 
13. अर्जदार/आरोपींना न्यायालयातील प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहावं लागणार
14. आरोपीनं यापैकी कोणत्याही अटींचं उल्लंघन केलं तर मात्र जामीन रद्द करण्यासाठी एनसीबी विशेष कोर्टात अर्ज करु शकते  

Aryan Khan Released : वो 26 दिन! क्रूझ पार्टी ते सुटका; असे होते आर्यन खानचे 26 दिवस!

मुंबई उच्च न्यायालयाकूडन अखेर जामीन मंजूर 

तब्बल 25 दिवसांनंतर आर्यन खानला जामीन मिळाला आहे. आर्यनसह अरबाझ मर्चंट आणि या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमेचा यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी आपली बाजू मांडताना तिघांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. 

आर्यन आणि इतरांच्या अटकेच्या वेळी मेमोमध्ये कलम 28 आणि 29 लावलेलं नसले तरी दंडाधिकारी न्यायालयाकडून पहिल्यांदा कोठडी मिळवताना अर्जात ते कलम लावलेलं होतं. तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत कोठडी हा नियम, तर जामीन हा अपवाद असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट केले आहे. एखाद्याकडून प्रत्यक्ष अमली पदार्थ हस्तगत झाले नाही, मात्र त्याला कटातील एक सहभागी म्हणून जबाबदार धरलं जातं, असेही निवाड्यांतून स्पष्ट होत असल्याचंही सिंग यांनी दाखला देताना सांगितलं. आर्यनसह इतरांची अटक बेकायदेशीर आहे हा दावा चुकीचा आहे. कारण, एनसीबीनं आतापर्यंत आरोपींची तीनदा कोठडी मिळवली, पण त्यांनी एकदाही त्याला आव्हान देण्यात आले नाही. त्यामुळे तो आधार आता घेतला जाऊ शकत नाही. 

अरबाज मर्चंट हा आर्यनचा लहानपणापासूनच मित्र आहे. तो आर्यनच्या घरी गेल्यानंतर तिथून दोघे एकत्र क्रूझ टर्मिनलकडे निघाले. ते क्रूझवर एकाच खोलीत राहणार होते. मात्र, त्यांना टर्मिनलवरच पकडण्यात आले. आरोपींकडून रक्त तपासणी झाली नसल्याचा दावा त्यांच्याकडून केला आहे. मात्र, तपासणीची गरजच काय? आर्यन आणि अरबाजने सेवन केलं असं आमचं म्हणणंच नाही. त्यांनी जाणीवपूर्वक अमली पदार्थ बाळगले होते, असा आमचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकताच नसल्याचं एनसीबीनं स्पष्ट केलं. आरोपींना जामिनावर सोडलं तर ते साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करू शकतात. त्यामुळे तिन्ही आरोपींचे अर्ज फेटाळण्यात यावे, अशी मागणीही सिंग यांनी केली.  

मुकूल रोहतगींचं आर्यनच्या वतीनं एनसीबीच्या दाव्याला उत्तर

क्रूझवर जवळपास तेराशे लोक होते, आर्यनचा संबंध केवळ अरबाजशी व नंतर अर्चित कुमारशी दाखवण्यात आला आहे. अनेकांचा संबंध हा योगायोग नाही म्हणून तो कट असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. आर्यनला क्रूझवर निमंत्रित करणारे गाबा आणि मानव आणखी दोघे होते पण त्यांना एनसीबीनं अटक केलेली नाही असा युक्तिवाद आर्यनतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी प्रत्युत्तरात दाखल केला.

आरोपी अरबाज मर्चंट याच्यावतीने जेष्ठ वकील अमित देसाई यांनी बाजू मांडताना एनसीबीच्या कार्यपध्दतीचा पर्दाफाश केला. एनसीबीनं अटकच्यावेळी सुरूवातीला अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन एवढ्याच आरोपाखाली अटक केली. परंतु, आतापर्यंत आरोपींना कट करस्थानाच्या आरोपाखाली अटक दाखवण्यात आलेली नाही. हे पंचनाम्यावरून दिसून येते .त्यानंतर एनसीबीने त्यांची कोठडी मिळावी म्हणून कलम 28, 29 ही कट कारस्थानाची कलमं लावली आहेत असा दावा केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिघाही आरोपींना सर्शत जामीन मंजूर केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aryan Khan : अखेर 26 दिवसांनी आर्यन खानची सुटका! किंग खानच्या चाहत्यांचा जल्लोष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...

व्हिडीओ

MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Embed widget