एक्स्प्लोर

Aryan Khan Released : वो 26 दिन! क्रूझ पार्टी ते सुटका; असे होते आर्यन खानचे 26 दिवस!

अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका झाली, अन् तो मन्नतकडे रवाना झाला. या संपूर्ण प्रकरणात काय-काय झालं? पाहुयात संपूर्ण घटनाक्रम...

Mumbai Cruise Drug Case : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी 26 दिवस कोठडीत काढल्यानंतर आज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ची सुटका होणार आहे. काही तासांत आर्यन खानची आर्थर रोड कारागृहातून सुटका होणार आहे. आणि त्याला घेण्यासाठी स्वतः शाहरुख खान (Shah Rukh Khan)  मन्नत बंगल्यावरुन निघाला आहे. साधारणतः सकाळी 10 ते दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान सुटका होऊ शकते अशी माहिती आर्थर रोडच्या कारागृह अधिकाऱ्यांनी दिली आहे. मन्नतवरुन निघालेला शाहरुख वाटेतल्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये थांबला असल्याचं कळतंय. त्याच्यासोबत वकील देखील असल्याचं समजतंय. तर तिकडे आर्थर रोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यासोबतच मन्नतबाहेर शाहरुख खानचे चाहते दाखल झाले आहेत. आर्यनच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून घोषणाही देण्यात येत आहेत.

किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज आर्थर रोड कारागृहातून बाहेर येणार आहे. परवा आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जामिनाची प्रत तुरुंगात वेळेत पोहचली नाही म्हणनू आर्यनची कालची रात्र तुरुंगातच गेली. आज पहाटे 5.30 वाजताच आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. त्यामुळे आता आर्यनच्या जामिनासाठीच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता आर्यनचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. सकाळी 8-9 दरम्यान आर्यन त्याचं घर मन्नत बंगल्याकडे रवाना होईल असं कळतंय. 

आर्यन खानला अटक झाल्यापासून संपूर्ण घटनाक्रम : 

  • आर्यन खान क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
  • 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवरील कोर्डिलिया क्रुझवर धाड
  • 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुटटीकालीन न्यायालयाकडून ४ ऑक्टोबरपर्यंत पहिली कोठडी
  • 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी आर्यनला एनसीबी ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
  • 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून आर्यनला न्यायालयीन कोठडी
  • आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोनानियमावलीनुसार आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात
  • न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनकडून जामिनाची याचिका
  • 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीकडून आक्षेप
  • मुख्य महानगदंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळला
  • 11 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात जामीनासाठी अर्ज
  • एनसीबीने उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
  • 12 ऑक्टोबर काहीही कारवाई नाही
  • 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीकडून तीव्र विरोध
  • एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. एएसजी अनिल सिंह यांची न्यायालयात माहिती
  • 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण न्या. वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला.
  • 15 ते 19 ऑक्टोबरपर्यंत सणासुदीच्यानित्ताने न्यायालय बंद.
  • आर्यनचा कारागृहातील मुक्काम वाढला
  • 20 ऑक्टोबरला न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
  • 26 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.
  • 27 ऑक्टोबरला आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.
  • 28 ऑक्टोबरला न्यायमूर्ती सांबरे यांच्याकडून अखेर जामीन मंजूर.
  • 29 ऑक्टोबर दुपारी 3 वाजता हायकोर्टाकडनं निकालाची प्रत उपलब्ध
  • 4:30 च्या सुमारास जुही चावला हमीदार म्हणून कोर्टात हजर
  • 6:45 वाजता कोर्टाची प्रक्रिया पूर्ण, आर्यनची सीलबंद रीलिज ऑर्डर जारी
  • 30 ऑक्टोबर पहाटे 5:30 वाजता रिलिज ऑर्डर आर्थर रोडच्या जामीन पेटीतून काढली
  • 30 ऑक्टोबर : अखेर आर्यन खानची जामीनावर सुटका 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aryan Khan : आर्यन खान जामीनावर कसा सुटला? जाणून घ्या शेवटच्या दिवशी काय युक्तीवाद करण्यात आला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget