Mumbai Crime: 'पाणीकपात आहे, अंघोळ नको करु', पत्नीच्या सल्ल्याने पती खवळला, रागाच्या भरात केलं भयानक कृत्य!
Mumbai Crime News: महापालिकेने केलेल्या पाणीकपातीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आहे. वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला.
Mumbai water shortage news : मुंबईमध्ये (Mumbai Water shortage) पाच टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीकपातीमुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहे. आता हीच पाणीकपात मुंबईत जीवावर बेतली आहे. महापालिकेने केलेल्या पाणीकपातीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने (Crime News) हल्ला केला. शनिवारी साकीनाका परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महापालिकेने केलेल्या पाणीकपातीवरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आहे. वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या पतीने पत्नीवर चाकू हल्ला केला. परमात्मा गुप्ता असे या पतीचे नाव आहे. तर पाणीकपात असल्यामुळे पत्नीने आंघोळ करण्यापासून पतीला रोखले, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
अंघोळ करण्यावरुन झाली बाचाबाची
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी परमात्मा गुप्ता आणि त्याची पत्नी मीरा हे साकीनाका येथील टिळक नगर येथे राहतात. शनिवारी गुप्ता उन्हातून घरी आले आहे. उन्हातून घरी आल्यानंतर घामाने भिजलेल्या परात्मा गुप्ता यांनी आंघोळ करण्याचे ठरवले. पण पत्नीने त्यांना आंघोळ करण्यास मनाई केली. बीएमसीची पाणीकपात सुरू आहे आणि पाण्याची बचत केली पाहिजे. यामुळे परमात्मा आणि त्यांच्या पत्नीमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने चाकूने पतीवर हल्ला केला. ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. साकीनाका पोलिस ठाण्याच्या पथकाने परमात्माला त्याच्या राहत्या घरातून उचलून हत्येचा गुन्हा दाखल केला.
वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून केला हल्ला
तर दुसरीकडे वाढदिवसाला केक उशिरा आणल्याच्या रागातून पतीने चाकूने पत्नी व मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात आरोपीची पत्नी रंजना शिंदे व सुनिल शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पत्नी रंजना शिंदेंनी दिलेल्या तक्रारीनुसार साकीनाका पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र शिंदेवर भादवी कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जून रोजी राजेंद्र यांचा वाढदिवस असल्याने पत्नी व मुलाने केक आणण्यास उशिर केल्यावरून राजेंद्र व रंजना यांच्याच वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेले राजेंद्र पत्नीच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात होते.त्यावेळी सुनिलने त्यांना अडवले. पाहता पाहता राजेंद्र यांनी घरातील भाजी कापायच्या चाकूने मुलाच्या पोटावर खांद्यावर तर रंजना यांच्या मनगटावर वार करत त्यांना जखमी केले. क्षुल्लक कारणांवरून पतीने पत्नीवर जिवघेणा हल्ला केल्याची साकीनाक्यातील ही दुसरी घटना आहे .
हे ही वाचा :