(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड, महिलेला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण
मुंबईत सायबर फसवणुकीचा (Cyber fraud in Mumbai) आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बोरिवलीत राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार झाला आहे.
Mumbai Crime News : मुंबईत सायबर फसवणुकीचा (Cyber fraud in Mumbai) आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बोरिवली (Borivali) परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार झाला आहे. या महिलेचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून नरेश गोयल प्रकरणाशी असल्याचे सांगून सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील तरुणीला विवस्त्र होण्यास भाग पाडून चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण
दरम्यान, तपासात तातडीने सहकार्य करावे, अन्यथा अटक करू,अशी धमकी देत व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढण्यास देखील भाग पाडले आहे. त्यानंतर तिचे चित्रीकरण करुन हा व्हिडिओ संपर्कातील नागरिकांमध्ये व्हायरल करण्यात आला आहे. त्यानंतर अटक आणि बदनामीची भीती दाखवत तिच्याकडून सुमारे 2 लाख रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिलेचा तक्रारीच्या अनुषंगाने दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडल्यामुळं दहिसर पोलिसांनी अंधेरी पोलिसांकडे गुन्हा वर्ग केले आहेत. अंधेरी पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
सायबर फसवणूक म्हणजे नेमकं काय?
सायबर फसवणूक ही इंटरनेटद्वारे सायबर हल्ला करणाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यांचे वर्णन करण्यासाठी एक ब्लँकेट शब्द आहे. हे गुन्हे आर्थिक फायद्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा व्यवसायाची संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे मिळवण्याच्या आणि त्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने केले जातात.
देशात दररोज शेकडो लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात
देशात दररोज शेकडो लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात. डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीची प्रकरणे प्रत्येक शहरातून वाढत आहेत. लोकांना यापासून सावध राहणे गरजेचे आहे. फसवणुकीचे हे प्रकार लोकांना माहित नसल्याने ते याला बळी पडतात. सायबर चोरांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला आहे. काही लोकांना हा स्कॅम असल्याचं लगेच लक्षात येतं पण अनेक लोकं आजही या जाळ्यात फसतात. या वर्षी देशात नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर ठग बनावट नोकऱ्यांसाठी भरतीचे मेसेज आणि लिंक पाठवतात. लोक लिंकवर क्लिक करतात आणि अर्ज करतात. यानंतर फसवणूक करणारे शुल्क किंवा जॉइनिंग किटच्या नावाखाली पैसे उकळतात.
महत्वाच्या बातम्या: