एक्स्प्लोर

Freebies Politics:  शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता 

RBI On Freebies: आरबीआयनं राज्य सरकारांना अनुदानावरील खर्च नियंत्रित करण्याची सूचना दिली आहे. अशा योजनांमुळं सामाजिक आणि आर्थिक पायाभूत विकासासाठी केली जाणारी रक्कम कमी होऊ शकते. 

Freebies Politics नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफइ इंडियानं राज्य सरकारांना निवडणुकीच्या काळातील लाभासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज, मोफत पाणी, मोफत बस प्रवास अशा लोकांवर प्रभाव टाकणाऱ्या योजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयनं त्यांच्या रिपोर्टमध्ये याबाबत इशारा देत म्हटलं की  अशा प्रकारामुळं सामाजिक, आर्थिक पायाभूत विकासावर परिणाम होऊ शकतो. 

राज्यांच्या आर्थिक स्थितीवर आरबीआयचा रिपोर्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 19 डिसेंबर 2024 ला स्टेट्‍स फायनान्स : स्टडी ऑफ बजेटस ऑफ 2024-25 रिपोर्ट जारी केला आहे. त्या रिपोर्टमध्ये आरबीआयनं म्हटलं की काही राज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. काही राज्यांनी कृषी आणि घरगुती वापरासाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली. काही राज्यांमध्ये मोफत प्रवासाची सुविधी दिली जात आहे. याशिवाय बेरोजगार युवकांना भत्ता दिला जातोय.  2024-25 मध्ये महिलांना देखील मदत केली जात आहे.  

सब्सिडीवरील खर्च कमी करा

आरबीआयनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की अशा प्रकारच्या खर्चामुळं सामाजिक आणि आर्थिक  पायाभूत क्षेत्राच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. लोकांना प्रभावित करणाऱ्या घोषणांमुळं महत्त्वाच्या क्षेत्रातील विकासावर परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी, घरांना मोफत वीज, मोफत प्रवास, स्वस्त दरात एलपीजी सिलेंडर, तरुण आणि महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणं अशा गोष्टींचा वाढता खर्च असल्यानं राज्यांच्या तिजोरीसाठी असा वाढता बोजा धोकादायक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. आरबीआयनं राज्यांना सब्सिडीवरील खर्च नियंत्रित करण्यासह योजनांना सुसंगत बनवण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक पायाभूत क्षेत्राच्या विकासावर खर्च केला जाणारा निधी कमी होऊ नये, असं सूचवलं आहे.  

राज्यातील वीज कंपन्यांच्या स्थिती खराब

आरबीआयनं त्या रिपोर्टमध्ये वीज वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयच्या मते वीज वितरण कंपनीची आर्थिक स्थिती राज्यांच्या आर्थिक स्थिती गंभीर आहे. वित्तीय पुनर्रचनेनंतर वीज  वितरण कंपन्यांवरील कर्ज 2016-17 पासून 8.7 टक्के वाढून 2022-23 पर्यंत 4.2 लाख कोटी रुपयांपर्ंयत पोहोचला होता. सध्या कर्जाचा बोजा 6.8 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

निवडणुकीतील फायद्यासाठी लोकप्रिय घोषणा

गेल्या काही वर्षांमध्ये राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांच्या पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलाकेंद्रीत योजनांची अंमलबजावणी होत असल्याचं पाहायला मिळतं.  

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget