एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड निवासस्थानी मोठी घडामोडी पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे दोन बडे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

नागपूर : एकीकडे नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2024) विविध मुद्द्यांनी गाजत आहे. यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील (Rohit Pawar) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे चिरंजीव सलील देशमुख हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या निमित्ताने विधानसभा मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने आपण भेटायला आलो आहोत अशी माहिती रोहित पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

सलील देशमुख देखील विजयगड बंगल्यावर 

तर रोहित पाटील यांच्या पाठोपाठ अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने भेटायला आलो असल्याची माहिती सलील देशमुख यांनी एबीपी माझाला दिली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक होण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. आज रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. या भेटीमागे काही राजकीय कारण नाही ना? अशा चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. 

गुलाबी रंगाच्या जॅकेटची अजूनही क्रेझ

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटची क्रेझ अजूनही पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहरातील पदाधिकारी गुलाबी रंगाचे जॅकेट घालून अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरविंद भाजीपाले हे पदाधिकाऱ्यांना घेऊन अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. इतकेच नाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील गुलाबी रंगाचा जॅकेट शिवून वापरण्यासाठी दिला आहे.  

आणखी वाचा 

Devendra Fadnavis : अजितदादा तु्म्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हा, पर्मनंट उपमुख्यमंत्री कमेंटवर देवेंद्र फडणवीसांकडून शुभेच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
रोहित शर्मानं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा सल्ला, शुभमन गिल बाबत म्हणाला...
रोहित शर्मा अन् शुभमन गिलचा फलंदाजी क्रम बदला, भारताच्या दिग्गज खेळाडूचा मेलबर्न कसोटीसाठी सल्ला 
Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Beed Crime :  आकांचं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लीकर लायसन्स घेतलंय - धसMNS Ultimatum  Kalyan : ....अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल; अखिलेश शुक्लाचे कारनामे...ABP Majha Headlines :  9 AM :  20 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSalil Deshmukh Nagpur : सलिल देशमुख, रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaipur Fire : CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
CNG अन् LPG टँकरची धडक होऊन भीषण स्फोट; 40 हून अधिक गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
रोहित शर्मानं वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा सल्ला, शुभमन गिल बाबत म्हणाला...
रोहित शर्मा अन् शुभमन गिलचा फलंदाजी क्रम बदला, भारताच्या दिग्गज खेळाडूचा मेलबर्न कसोटीसाठी सल्ला 
Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं
Freebies Politics:  शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता 
शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिला- युवकांच्या खात्यात थेट रक्कम, मोफत वीज अन् प्रवासाच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता 
Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
Ajit Pawar : अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Embed widget