एक्स्प्लोर

Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...

Suhas Kande on Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलल्यानंतर सुहास कांदेंनी मोठा दावा केलाय.

Suhas kande on Chhagan Bhujbal : एकीकडे नागपूरमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2024) सध्या चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीची जोरदार चर्चा राज्यभरात रंगली आहे. कारण रविवारी (दि. 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर आता शिवसेना शिंदे गटाचे नांदगावचे आमदार आणि भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे (Suhas Kande) यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधत मोठा दावा केला आहे. 

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी मोठी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील,  अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंखे यांच्यासह बडे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे. 

काय म्हणाले सुहास कांदे? 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. नाशिक जिल्ह्यात जे झालं, ते अतिशय चांगलं वाटलं. मला एकदम छान वाटलं, असा टोला त्यांनी छगन भुजबळांना लगावला. तर भुजबळांबाबत जे सध्या घडलं, त्याचे पुरावे मी वरिष्ठांना दिले होते. माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असा दावा देखील सुहास कांदे यांनी केला आहे. आता सुहास कांदे यांच्या दाव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

सुहास कांदेंनी केलाय समीर भुजबळांचा पराभव

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. कारण छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्याशी झाली. नांदगावमधील प्रचारादरम्यान भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पाहायला मिळाला होता. मतदारांच्या दिवशी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची देखील झाली होती. मात्र, या निवडणुकीत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला. 

आणखी वाचा 

Manoj Jarange : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही, मनोज जरांगेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
Ajit Pawar : अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Video : विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल
Video : विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM :  20 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSalil Deshmukh Nagpur : सलिल देशमुख, रोहित पाटील अजित पवारांच्या भेटीलाDharashiv Windmill : धाराशिवमधील ठोंबरे कुटुंब पवनचक्की गुंडांच्या दहशतीखालीABP Majha Headlines :  8 AM : 20 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suhas kande on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू, कट्टर विरोधक सुहास कांदेंचा मोठा दावा; म्हणाले...
Ajit Pawar : अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
अजितदादांच्या बंगल्यावर मोठ्या घडामोडी, शरद पवारांचे दोन खंदे शिलेदार भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण
Kalyan Marathi family beaten: मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
मराठी माणूस जागा झाला! परप्रांतीयांकडून देशमुख कुटुंबाला मारहाण, कल्याणमध्ये वातावरण तापलं, अजमेरा हाईटसमध्ये घोषणाबाजी
Video : विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल
Video : विराट कोहलीला संताप अनावर, विमानतळावर थेट रिपोर्टशी भिडला, क्रिकेटच्या किंगचा व्हिडीओ व्हायरल
NACDAC IPO : 10  कोटींच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO तब्बल 1976 पट सबस्क्राइब
10 कोटींच्या आयपीओसाठी तब्बल 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO 1976 पट सबस्क्राइब
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Marathi family beaten in Kalyan: फेक IAS  शुक्लाचा माज उतरवण्यासाठी आता मनसे मैदानात, वॉर्निंगच दिली; 24 तासांत अटक करा अन्यथा....
फेक IAS शुक्लाचा माज उतरवण्यासाठी आता मनसे मैदानात, वॉर्निंगच दिली; 24 तासांत अटक करा अन्यथा....
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Embed widget