Suresh Dhas : 'आका'चं कार्यक्षेत्र वाढत चाललंय, लिकर लायसन्स घेतले, बीड प्रकरणावरून सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Suresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरेश धस चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session 2024) उमटले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडीओ कॉल करुन मारेकऱ्यांनी त्यांच्या 'आका'ला दाखविले असल्याचा आरोप विधानसभेत केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता सुरेश धस यांनी 'आका'वरून धक्कादायक खुलासा केलाय. तसेच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.
सुरेश धस म्हणाले की, नऊ तारखेला ही घटना घडली. त्याअगोदर दोन दिवसआधी वाईन शॉपसाठी दोन गाड्यांची खरेदी झाली. खरेदी सब रजिस्टर ऑफिसमध्ये करण्याऐवजी कुठेतरी हे 'आका' बसले होते, पोलीस अधिकारीही बसले होते. तिथे जाऊन खरेदी करण्यात आली, अशी एक नवीन माहिती मिळाली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र मांजरसुमा घाट म्हणून आहे तेथे 30 ते 35 एकर जमीन कोणाच्यातरी अचानक नावावर झाली, हे कुणाच्याही शेतातून मुरूम उचलतात. या आकाचं यांचं कार्यक्षेत्र खूप वाढत चालले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे आका नक्की कोण? असे विचारले असता सुरेश धस म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे आज या याबाबत एसआयटी जाहीर करतील. एसआयटी जाहीर झाल्याशिवाय आणि एसआयटीने तपास केल्याशिवाय यावर अधिकचे बोलणे उचित होणार नाही, असे त्यांनी म्हटले.
सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर आरोप
ते पुढे म्हणाले की, अजित पवारांकडे मी आधी आलो होतो, तेव्हा मी बोललो होतो की, पिक विमा घोटाळा फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. 7000 हेक्टर बीड जिल्ह्यात, 3000 हेक्टरचा धाराशिवमध्ये घोटाळा सापडला आहे. आता याबाबत कागदपत्र लवकरच माझ्याकडे येणार आहेत. 13 हजार 190 सोनपेठ तालुक्यामध्ये विमा भरलाय. विमा भरणारे सीएससी सेंटर परळी तालुक्यातील आहे. मी काही परळी तालुक्यातील सर्व जनतेला किंवा शेतकऱ्यांना दोष देत नाही. मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आलेला आल्याचा आरोप त्यांनी केलाय. 2023 मध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. महायुतीच्या काळात तत्कालीन कृषीमंत्री यांनी एक रुपयात पिक विमा योजनेचा किती गैरफायदा घेतला हे मला म्हणायचे आहे असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.
आणखी वाचा