एक्स्प्लोर

Nagpur Crime : क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी; महिलेला धक्काबुक्की, लोटांगण घालून पाया पडायला लावलं

Nagpur Crime : नागपुरात पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादानंतर टवाळखोर तरुणांच्या जमावानं पेट्रोल पंप चालवणाऱ्या 44 वर्षीय महिलेला तरुणांच्या पायावर लोटांगण घालून सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडलं.

Nagpur Crime : राज्याची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. नागपुरात एका पेट्रोल पंप चालक महिलेला धक्काबुक्की करण्यात आली आहे. क्षुल्लक वादातून पेट्रोल पंपावर टोळक्याची दादागिरी पाहायला मिळाली. वाद फारच विकोपाला गेला आणि त्यानंतर पेट्रोलपंप चालक महिलेला पायावर लोटांगण घेत माफी मागण्यास टोळक्यानं भाग पाडलं. टोळकं एवढ्यावर थांबलं नाही, तर त्यांनी त्यानंतर या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. 

नागपुरात पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादानंतर टवाळखोर तरुणांच्या जमावानं पेट्रोल पंप चालवणाऱ्या 44 वर्षीय महिलेला तरुणांच्या पायावर लोटांगण घालून सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पाडलं. त्यानंतर तिच्या माफिचे ते व्हिडीओ परिसरात तिची बदनामी करत आपली दादागिरी प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टानं व्हायरल केले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे. 

प्रकरण नेमकं काय?

18 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता नागपूर हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिक झोन चौकावर पीडित महिला सुचित्रा लोहकरे आपल्या पेट्रोल पंपावर उपस्थित होती. त्यावेळी एका बाईकवर आलेल्या दोन तरुण पेट्रोल पंपावर काम नसताना इकडे तिकडे फिरू लागले. त्यामुळे पेट्रोल पंप संचालिका सुचित्रा लोहकरे यांनी त्यांना हटकलं. या मुद्द्यावर दोन्ही तरुणांचा सुचित्रासोबत शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की सुद्धा झाली. थोड्यावेळानंतर वाद घालणारे तरुण परिसरातील आपल्या गुंड प्रवृत्तीच्या इतर सहकाऱ्यांना घेऊन आले. रात्री दहा वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर आलेल्या या जमावानं जोरदार गोंधळ तर घातलाच. सोबतच इलेक्ट्रिक झोन चौकावर आमची दादागिरी चालते, इथे एवढा मोठा कोण झाला आहे? जो आमच्या सहकाऱ्यांना दमदाटी करेल, असं सांगत सुचित्रा लोहकरे यांनी माफी मागावी असा दबाव आणला. 

रात्रीच्या वेळी एवढा मोठा जमाव आपल्या विरोधात पेट्रोल पंपावर आला आहे, हे लक्षात घेऊन सुचित्रा यांनी शाब्दिक माफी मागितली. मात्र जमावाचा नेतृत्व करणारा राजेश मिश्रा नावाचा व्यक्ती ज्या तरुणांशी तुम्ही वाद घातला होता, त्यांच्या पायावर लोटांगण घालून माफी मागावी लागेल, असा हट्ट धरून होता. त्यामुळे जमावाच्या दबावापुढे नमतं घेत सुचित्रा लोहकरे यांना पायावर लोटांगण घालत माफी मागावी लागली. जमावातील काही टवाळखोर तरुणांनी तो व्हिडीओ चित्रित करून परिसरात सुचित्रा यांचा सार्वजनिक अवमान करण्यासाठी व्हायरल केला.

दरम्यान, व्हिडीओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत गुन्हा दाखल केला. धमकावणं, शिवीगाळ करणं, विनयभंग करणं अशा विविध कलमान्वये राजेश मिश्रा आणि त्याच्या काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटकही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget