एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'सेटलमेंट' करणाऱ्या घटस्फोटित दाम्पत्याला हायकोर्टाचा दंड

आतापर्यंत कोर्टाने पतीकडून दंड वसूल केला आहे. यावेळी मात्र कोर्टाने पतीसोबतच पत्नीलाही दंड सुनावला.

मुंबई : सेटलमेंट करुन हुंड्याची तक्रार मागे घेणाऱ्या घटस्फोटित दाम्पत्यालाच मुंबई हायकोर्टाने दंड ठोठावला आहे. पतीला 20 हजार तर पत्नीला 10 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली होती. मात्र दोघांनी सेटलमेंट करुन हे प्रकरण निकाली काढलं. सेटलमेंटसारख्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये पोलिस आणि कोर्टाची मशिनरी वापरली जाते. आतापर्यंत कोर्टाने पतीकडून दंड वसूल केला आहे. यावेळी मात्र कोर्टाने पतीसोबतच पत्नीलाही दंड सुनावला. मुंबईच्या वरळीतील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडला दंडाची रक्कम देण्यास कोर्टाने सांगितलं आहे. पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर तिने आपल्याविरुद्ध आणि कुटुंबीयांविरुद्ध केलेल्या सर्व फौजदारी कारवाया मागे घेण्याचं आश्वासन दिलं, असं पतीने कोर्टात सांगितलं. 2013 मध्ये कांदिवली पोलिसात तरुणीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तरुणाविरोधात कलम 498अ अन्वये गुन्हा दाखल झाला. 2016 मध्ये तरुणीने वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. जून महिन्यात कोर्टाने त्यांना विवाह सल्लागाराकडे पाठवलं. हिंदू मॅरेज अॅक्टच्या 13ब नुसार दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget