Mumbai Corona : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या खरंच स्थिर झाली आहे का?
मुबईतील रोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून दिवसाला तीन ते पाच हजारांनी वाढणारी रुग्ण संख्या स्थिर झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई : मुंबईत मागील तीन ते चार दिवसांपासून दिवसाला दुप्पट - तिप्पटीने वाढणारी मुंबईतली कोरोना रुग्णसंख्या स्थिरवल्याच चित्र दिसतं आहे. कारण दिवसाला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्यांचा आकडा हा 20 हजारांच्या जवळपास आहे. तर दुसरीकडे कोरोना चाचण्याचा प्रमाण सुद्धा त्या तुलनेत कमी जास्त होत आहे. त्यामुळे मागील 10 दिवसात अगदी पाच ते सहा हजाराहून थेट दिवसाला 20 हजारांपर्यत वाढणारी रुग्ण संख्या खरंच स्थिर झालीये का? किंवा असा म्हणता येईल का? की कोरोना चाचण्या आणखी वाढविण्यात आल्या तर रुग्णसंख्या आणखी वाढेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- 6 जानेवारी - मुंबईत दिवसाला आढळलेले कोरोना रुग्ण - 20,181
- 7 जानेवारी - मुंबईत दिवसाला आढळलेले कोरोना रुग्ण - 20,971
- 8 जानेवारी - मुंबईत दिवसाला आढळलेले कोरोना रुग्ण - 20,318
- 9 जानेवारी - मुंबईत दिवसाला आढळलेले कोरोना रुग्ण - 19474
आता ही मुंबईतील रोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून दिवसाला तीन ते पाच हजारांनी वाढणारी रुग्ण संख्या स्थिर झाल्याचे चित्र दिसतय. मात्र खरंच मुंबईतली वाढणारी कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाली आहे का?
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या दिवसाला जरी 20 हजारपर्यंत थांबली असली तरी ती सध्या स्थिर झाली आहे असा म्हणता येणार नाही. कारण कोरोना चाचण्या वाढवल्या तर ही रुग्णसंख्या दिवसाला वीस हजार पार जाऊ शकते, असा तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणं आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत अनेक जण कोरोनाची सौम्य लक्षणे आढळत असल्याने कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करता आहे किंवा चाचणी करण्यास पुढे येत नाही. तर काही असे सुद्धा रुग्ण आहेत जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत मात्र त्यांना कुठलीही लक्षणं दिसत नाहीत.
मुंबईत 1 जानेवरीपासून वाढणारी रुग्णसंख्या आणि होणाऱ्या कोरोना चाचण्यांवर लक्ष टाकलं तर कोरोना चाचण्यांच्या संख्येनुसार रुग्ण संख्या कशी वाढली ते आपल्या लक्षात येते
- 1 जानेवारी - 24 तासात नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 6347 (कोरोना चाचण्या 47,978)
- 3 जानेवारी -24 तासात नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 8082 (कोरोना चाचण्या 49,283)
- 5 जानेवारी- 24 तासात नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 15,166 (एकूण कोरोना चाचण्या - 60,014)
- 7 जानेवारी -24 तासात नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 20,971 (एकूण कोरणा चाचण्या 72,442)
- 9 जानेवारी- 24 तासात नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 19,474 (एकूण कोरोना चाचण्या 48,249)
शिवाय, सेल्फ टेस्टिंग किटद्वारे कोरोना चाचणी करून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अनेक रुग्णांचा डेटा सुद्धा प्रशासनापर्यत पोहचत नसल्याचे लक्षात येत असल्याने कोरोनाचा आकडा मुंबईत सध्या तरी स्थिर झाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे.
या आकडेवारीवर नजर टाकल्यानंतर रोजची रूग्णसंख्या पाहता आणि होणाऱ्या चाचण्यांचा आढावा घेतल्यानंतर
मुंबईची रुग्णसंख्या ही अजून स्थिर झालेली नाही. कोरोना चाचण्या मुंबईत वाढल्या तर रोज 20 हजारपर्यंत येणारी रुग्ण संख्या वाढलेली पाहायला मिळेल. त्यामुळे लक्षण जाणवत असली तर चाचणी करायला आणि स्वतः हून घरीच कोरोना चाचणी करत असाल तर अहवाल प्रशासनापर्यंत पोहचवण्यास हलगर्जीपणा करू नका ! करण अजूनही रुग्णसंख्येचा मुंबईतला चढता क्रम स्थिर झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
- Sulli Deals : 'बुली बाई'नंतर 'सुली डिल्स' अॅप चर्चेत, जिथे रचला गेला मुस्लीम महिलांना ट्रोल करण्याचा पहिला कट