Mumbai Corona Update: दिलासादायक...! मुंबई, पुण्यात कोरोना उतरणीला, नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज 1657 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2572 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 37 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज 1657 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2572 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 37 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 1,946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 2,037 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 199 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले आहे.
पुण्यात 18 एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम
पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात शहरातील 3 हजार 318 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 24 हजार 990 झाली आहे. 18 एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे.
मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त
मुंबई महापालिकेच्या कामगिरीचं देशभरात कौतुक होत असलं तरीही मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याचं आकडेवारीवरुन समोर येतंय. मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण स्थिरावले आहेत मात्र त्या तुलनेत रुग्णांच्या मृत्यूची मात्र घट होताना दिसत नाही. ही गोष्ट चिंतेची आहे. कोरोनाच्या संकटात मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापनाचं सुप्रीम कोर्टासह नीती आयोगाने कौतुक केलं. मात्र त्याच मुंबईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसात मुंबईतला मृत्यूदर वाढतोय.