एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत यंदा कारची विक्री 20 टक्क्यांनी घटली!
मुंबई, बंगळुरु,चेन्नई ह्या महानगरांमध्ये कार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे
मुंबई : मुंबईत आता कारची विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी कमी झाल्याचं इंडस्ट्री सोर्सच्या अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतावणाऱ्या पार्किंग समस्या, ट्रॅफिक समस्या यामुळे ही विक्री घटल्याचं अहवालात नमूद केलं आहे.
मुंबई, बंगळुरु,चेन्नई ह्या महानगरांमध्ये कार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मेट्रो सिटीत असलेला पार्किंगचा प्रश्न, ट्रॅफिक, ओला-उबरचा वाढता वापर, पेट्रोलचे वाढते भाव हे सगळं विचारात घेऊन, आता लोकांची कार विकत घेण्याची क्रेझ कमी झाली आहे.
मुंबईची आताची परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे, त्यामुळे जागोजागी ट्रॅफिकची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय, जिथे लोकांना राहायला जागा नाही, अशा मुंबईत कार पार्किंग करायला जागेची समस्या आ वासून उभी आहे.
कार विक्री कशा पद्धतीने कमी झाली?
- मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20.4 टक्के घट
- मुंबईत 2016 -17 साली कारची विक्री 1 लाख 22हजार एवढी होती
- पण 2017-18 साली कारच्या विक्रीत घट होऊन 97,224 वर आली
- बंगळुरु आणि चेन्नईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते
- बंगळुरुमध्ये कार विक्रीची घट 11.2 टक्के, तर चेन्नईमध्ये 4.5 टक्के आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement