मोठी बातमी : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू
Mumbai Chawl Wall Collapsed : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
![मोठी बातमी : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू Mumbai Building Wall Collapsed Two women were killed in an accident when a part of the house collapsed in Antop Hill area of Mumbai मोठी बातमी : मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना, दोन महिलांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/40f6cc3eeaeab28ae139ded961f5b7ae1718386565567322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईच्या वडाळा अँटॉप हिल (Wadala Antop Hill) परिसरात चाळीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील चाळीचा काही भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईत चाळीची भिंत कोसळून दुर्घटना
मुंबईच्या अँटॉप हिलच्या विजयनगर येथील पंजा गल्लीतील ही घटना समोर आली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. शोभादेवी मौर्य वय 45 आणि झाकिरूनिसा शेख वय 50 वर्ष अशी दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. या दोन महिलांना उपचारासाठी सायन रुग्णालयात नेलं असता उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित करण्यात आलं.
भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
मुंबईतील अँटॉप हिल येथील विजय नगर येथे चाळीतील भिंत कोसळली. यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. ग्राउंड + 3 स्ट्रक्चरच्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेतील दोन्ही जखमींना सायन येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
वडाळा अँटॉप हिल परिसरातील दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळला. वडाळा अँटॉप हिलच्या विजय नगरमधील पंजा गल्ली परिसरात हील घटना घडली. चाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आणि वरच्या तीन मजल्यांवरील भिंतीचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग लटकलेल्या स्थितीत होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या जखमींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)