एक्स्प्लोर

Mumbai : आजारपणास कंटाळून वृद्ध जोडप्याचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

सकाळी मुलगा नाश्ता देण्यासाठी गेल्यानंतर दोघेही दार उघडत नव्हते, त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला, तेव्हा दोघेही बेडवर झोपले असल्याचे दिसून आले. ते काही उत्तरही देत ​​नव्हते.

Mumbai News Updates: मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध पती-पत्नीने दीर्घ आजारपणास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात 76 वर्षीय पत्नी सविता सुर्वे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे 77 वर्षीय पती दत्ताराम सुर्वे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. हा प्रकार त्यावेळी उघडकीस आला जेव्हा त्यांचा मुलगा आज सकाळी त्यांना नाश्ता देण्यासाठी गेला. सकाळी मुलगा नाश्ता देण्यासाठी गेल्यानंतर दोघेही दार उघडत नव्हते, त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला, तेव्हा दोघेही बेडवर झोपले असल्याचे दिसून आले आणि काही उत्तरही देत ​​नव्हते.

बोरिवली पूर्व मुंबई येथे राहणारं हे वृद्ध जोडपं आजारपणाला कंटाळून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामध्ये सविता दत्ताराम सुर्वे यांचा मृत्यू झाला आहे. सविता सुर्वे यांना मागील पंधरा-वीस वर्षापासून डायबेटिसचा आजार होता. तसेच त्यांना डोळ्यांना दिसत नव्हते त्या अंथरुणावर खिळून होत्या. सोबतच त्यांचे पती  दत्ताराम सुर्वे यांना मागील 25 वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती.

तसेच त्यांचे हार्टचे काउंट कमी असल्यामुळे पेस मेकर बसवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा हात आणि छातीत खूप दुखत असे. तसेच 2020 मध्ये त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. आज सकाळी 06.15 वा. त्यांचा मुलगा सचिन सुर्वे नेहमी प्रमाणे आई-वडिलांना नाश्ता देण्यासाठी गेले असता त्यांचे वडील दरवाजा उघडत नव्हते. म्हणून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांचे आई-वडील बेडवर झोपलेल्या स्थितीत होते. दत्ताराम सुर्वे 77 वर्ष हे अस्पष्ट बोलत होते. त्यांना उपचारसाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दरम्यान सविता सुर्वे यांचा मात्र मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  

सचिन सुर्वे यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचे आईवडील रत्नाकर सी एच एस, टाटा पॉवर, बोरिवली पूर्व,मुंबई येथेच दुसऱ्या मजल्यावर राहायला आहे. सकाळच्या वेळी ते  नेहमी प्रमाणे आई-वडिलांना  नाश्ता देण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दोघांनी दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रूमचा दरवाजा उघडला असता त्यांचे आई- वडील बेडवर झोपलेल्या स्थितीत होते आणि शरीर पूर्ण ताठरलेले होते. यावेळी वडील दत्ताराम हे शुद्धीत होते, असं सचिन यांनी सांगितलं.  यानंतर त्या दोघांनाही उपचारसाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या दरम्यान सविता सुर्वे यांचा मात्र मृत्यू झाला. 

ही बातमी देखील वाचा

Samruddi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांना 'समृद्ध' करणारा निर्णय? बांधकामासाठीचे गौण खनिजाबाबत दंडासंदर्भातील आदेश रद्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget