एक्स्प्लोर

मुंबईकरांनो, पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा बुक करा; मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार

Mumbai Vehicle Parking App: मुंबईत ठिकाणावर पोहोचण्यापूर्वीच पार्किंगची जागा, स्लॉट ऑनलाईन बुक करता येणार प्रस्तावित मुंबई पार्किंग प्राधिकरणाची मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार, या प्रकल्पासाठी 38 कोटी रुपये खर्च होणार आहे.

Mumbai Vehicle Parking App:  मुंबईत (Mumbai News) आता पोहचण्याआधीच आपली पार्किंग जागा (Parking Space), स्लॉट बुक करता येणार आहे. प्रस्तावित मुंबई पार्किंग प्राधिकरणाची मुंबई पार्किंग इंटरफेस प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 38 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) एकात्मिक माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यमातून रस्त्यासह (ऑन स्ट्रीट), रस्त्यालगतच्या (ऑफ स्ट्रीट) तसेच इतर ठिकाणच्या पार्किंगशी संबंधित माहितीचे सर्वंकष डिजिटलायजेशन करण्याच्या उद्दिष्टानं मुंबई पार्किंग पूल (एमपीपी) तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये विद्यमान तसेच प्रस्तावित अशा पार्किंगशी संबंधित प्रकल्पांची शासकीय, व्यावसायिक आणि खासगी संस्थांच्या पार्किंगची संबंधित माहिती एकत्रित केली जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे, या एकाच डेटाबेसमधून संबंधित सर्व भागधारकांना पार्किंगच्या डेटाबेसचा वापर करणं सुलभ होणार आहे. मुंबईतील पार्किंग व्यवस्थापनासाठी प्रस्तावित सदर माहिती तंत्रज्ञान प्रणालीतून बृहन्मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्किंग संचलन, उपलब्ध पार्किंग जागांचा पुरेपूर वापर करण्यासह एकूणच रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर शासकीय संस्था म्हणजे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगतची (रोडसाईड) पार्किंग आणि खासगी गृहनिर्माण संस्थांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा अशी सर्वच माहिती एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध होणार असल्यानं ही खूप मोठी बाब ठरणार आहे. सॉफ्टवेअर इंटरफेसमुळे या सर्व पार्किंगच्या सुविधेशी संबंधित बाबी एकत्रित करणं शक्य होईल. 

या सुविधेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचे एकूणच चित्र पालटणार आहे. मुंबईकरांना 24 तास पार्किंगशी संबंधित माहिती मोबाईल आणि इतर गॅजेटमध्ये उपलब्ध होणार असून कधीही, कुठेही पाहणं शक्य होणार आहे. परदेशात ज्या पद्धतीनं एखाद्या ठिकाणी पोहचण्याआधीच आपला पार्किंग स्लॉट बुक करता येतो, रक्कम अदा करता येते, त्याच धर्तीवर अगदी सहज ऑनलाईन पद्धतीनं कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही सुविधा मुंबईकरांना सुलभरित्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. 

रस्ते वगळून पार्किंग (ऑफ स्ट्रीट पार्किंग)

ऑफ स्ट्रीट पार्किंगच्या ठिकाणी प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी बूम बॅरियर्स लावण्यात येतील. या सुविधेअंतर्गत 2 तास आगाऊ स्वरूपात आरक्षणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. मोबाईल किंवा वेब अॅप्लिकेशनचा वापर करून वाहनांशी संबंधित माहिती नोंद करता येईल. वापरकर्त्यांना आपला स्लॉट हा ऑनलाईन डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून बुक करता येईल. त्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट / डेबिट / यूपीआय या डिजिटल पर्यायांचा वापर करता येईल. त्यासोबतच आरक्षित केलेला कालावधी संपण्याच्या 15 मिनिटं आधी वापरकर्त्याला एमएसएसद्वारे अलर्ट देण्यात येईल. वापरकर्त्यांकडून सुविधा वापरासाठीचं शुल्क हे बाहेर पडताना वसूल करण्यात येईल. तसेच आरक्षित केलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुविधा घेतली असल्यास त्याच्या दंडाची रक्कमही त्याचवेळी वसूल करण्यात येईल. 

रस्त्यावरील पार्किंग (ऑन स्ट्रीट पार्किंग)

ऑन स्ट्रीट पार्किंगसाठी कोणतीही आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध नसेल. एखादा वापरकर्ता ऑन स्ट्रीट पार्किंगच्या 200 मीटर क्षेत्रात पोहचल्यास उपलब्धततेनुसार त्याला तो उपलब्ध स्लॉट दिसणार आहे. या सुविधेसाठी ऑनलाईन तसेच रोख रक्कम अदा करण्याचा पर्याय असणार आहे. यामध्ये सुविधेसाठी पुरवठादारावर जबाबदारी असेल की, त्याला नेमून दिलेल्या संबंधित परिसरातील पार्किंगची उपलब्धतता कॅमेरा आणि व्हिडिओ/सेन्सर एनेलिटिक्सच्या माध्यमातून वेब आणि मोबाईल एप्लिकेशनवर दाखवावं.  

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget