एक्स्प्लोर
रिक्षाला आग लागल्याने 9 प्रवासी भाजले

मुंबई: मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरची आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका रिक्षाला आग लागून एकाच कुटुंबातले 9 जण भाजले आहेत. पण ऑटो रिक्षाची आसन क्षमता तीन असताना, 9 जण बसलेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काल रात्री शिवाजीनगर कडून टिकळ टर्मिनर्सकडे जात होती. त्यावेळी रिक्षानं अचानक पेट घेतला.. सीएनजी गॅसची गळती झाल्यानं रिक्षानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिऴाली आहे. यात प्रकरणात एकाच कुटुंबातील 8 जणांचा समावेश आहे.
कुंटुंबातील जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या 8 जखमीमध्ये एकूण 3 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 5 मुलांमधील दोन महिन्यांची दोन मुलेही आहेत. हे कुंटुंब एका समारंभासाठी कर्नाटकला चालले होते.
पण तीन आसनी ऑटो रिक्षात 9 जण बसलेच कसे असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
विश्व
टेक-गॅजेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
