एक्स्प्लोर
लालबागचा राजाला अर्पण झालेल्या सोन्या-चांदीचा लिलाव सुरु
यंदाही लालबागचा राजाच्या चरणी लाखो किंमतीच्या वस्तू अर्पण झाल्या असून त्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने लालबागचा राजाला दरवर्षी भरभरुन मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. यंदाही लालबागचा राजाच्या चरणी लाखो किंमतीच्या वस्तू अर्पण झाल्या असून त्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
यंदा 14 किलो 433 ग्रॅम चांदी आणि 3 किलो 673 ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे.
यातील आकर्षण म्हणजे एक किलोपेक्षा जास्त वजनाची लालबागचा राजाची मूर्ती, ज्यावर हिरा लावलेला आहे. या मूर्तीची किंमत एक लाखापेक्षा जास्त आहे. शिवाय एक किलो वजनाचं सोन्याचं चॉकलेट आणि एका सोन्याच्या बिस्किटाचाही लिलाव केला जाणार आहे.
यंदा लालगाबचा राजाच्या चरणी एकूण साडेपाच किलोपेक्षा जास्त सोनं आणि 75 किलोपेक्षा जास्त चांदी अर्पण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement