एक्स्प्लोर

Bombay High Court: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रियाच बेकायदेशीर, गोदरेजचा हायकोर्टात दावा

Mumbai Ahmedabad Bullet Train: प्रकल्पाच्या विलंबास आम्ही कारणीभूत असल्याचा राज्य सरकारचा दावा चुकीचा असल्याचं गोदरेजनं कोर्टात सांगितलं. 21 नोव्हेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी तहकूब

Godrej Boyce, Bombay High Court : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad Bullet Train) प्रकल्पासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा गोदरेजनं हायकोर्टात केला आहे. गोदरेज अॅण्ड बॉईस कंपनीनं गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनीच अडथळे आणून प्रकल्पास उशीर करत असल्याचा राज्य सरकारचा आरोप खोडून काढला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्याच्या राज्याच्या आदेशाला कंपनीनं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या याचिकेला विरोध करत राज्य सरकारनं कंपनीवर खापर फोडणारं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल केलं होतं. त्यात भूसंपादन प्रक्रियेस विलंब होण्यास गोदरेज कंपनीच जबाबदार असल्याचा दावा राज्य सरकारनं केला आहे. मात्र राज्य सरकारच्या या आरोपांचं खंडन करत कंपनीनं गुरूवारी आपलं प्रतिज्ञापत्र न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपोठसमोर झालेल्या सुनावणीच्या सादर केलं. त्याची नोंद घेत हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 21 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

बुलेट ट्रेनसाठीच्या जागेकरता राज्य सरकार देत असलेल्या 264 कोटींच्या नुकसानभरपाई विरोधात गोदरेजनं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. विक्रोळीतील 10 हेक्टरचा प्लॉट बुलेट ट्रेनसाठी ताब्यात घेण्याची तयारा सुरू केली आहे. मात्र कंपनीनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयानं दाद मागत या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारनं बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक या प्रस्तावित जागेकरता गोदरेज कंपनीला 264 कोटींची नुकसानभरपाई देण्याचं निश्चित केलं होतं. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणा-या या 534 किमीच्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये 21 किमी लांबीची एक बोगदा बांधण्यात येणार आहे, जो ठाणे खाडीच्या खालून जाईल. या बोगद्याची सुरूवात विक्रोळीतून होणार आहे. याच कामासाठी राज्य सरकारनं मार्च 2018 मध्ये विक्रोळीतील 39 हजार 547 चौ.किमी. चा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया जमीन अधिग्रहण कायदा, 2013 नुसार सुरू केली होती. 

मात्र कंपनीनं आता दावा केला आहे की, याप्रकरणातील नुकसानभरपाईची सुनावणी होऊन आता 26 महिन्याहून अधिकचा कालावधी उलटून गेलाय. त्यामुळे कायद्यातील तरतूदीनुसार जुन्या दरानं झालेला जमीन अधिग्रहणाचा हा करार आता रद्द होतो. तर दुसरीकडे आधीच हा प्रकल्प चार वर्ष रखडल्यामुळे राज्य सरकारनं जोपर्यंत हा वाद निकाला निघत नाही, तोपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम कोर्टात जमा करण्याची परवानगी मागितली आहे. कारण विक्रोळीतील 3 हजार एकरच्या जागेच्या मालकीवरून साल 1973 सालचा राज्य सरकार आणि गोदरेज यांच्यातील वादही अद्याप प्रलंबित आहे. ज्यामुळे जनतेच्या हितासाठी उभारण्यात येणारा बुलेट ट्रेन प्रकल्पही रखडला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Winter Session : धनकड म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा सहन होईना, मी कामगाराचा मुलगा, खरगेंचा सुद्धा जोरदार पलटवार; राज्यसभेत रणकंदन
धनकड म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा सहन होईना, मी कामगाराचा मुलगा, खरगेंचा सुद्धा जोरदार पलटवार; राज्यसभेत रणकंदन
Devendra Fadnavis : जगात हिंदू अर्थव्यवस्थेची थट्टा उडवली, पण 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल, WHEF मध्ये फडणवीसांनी व्हिजन मांडलं
जगात हिंदू अर्थव्यवस्थेची थट्टा उडवली, पण 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल, WHEF मध्ये फडणवीसांनी व्हिजन मांडलं
Indian Cricketers Who have acted in Movie : भज्जी ते शिखर धवनपर्यंत! या 10 क्रिकेटपटूंनी अभिनयातही हात आजमाजवला; एकाने खलनायक साकारत खळबळ उडवून दिली
भज्जी ते शिखर धवनपर्यंत! या 10 क्रिकेटपटूंनी अभिनयातही हात आजमाजवला; एकाने खलनायक साकारत खळबळ उडवून दिली
Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रियाEknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गारNagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरूNCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Winter Session : धनकड म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा सहन होईना, मी कामगाराचा मुलगा, खरगेंचा सुद्धा जोरदार पलटवार; राज्यसभेत रणकंदन
धनकड म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा सहन होईना, मी कामगाराचा मुलगा, खरगेंचा सुद्धा जोरदार पलटवार; राज्यसभेत रणकंदन
Devendra Fadnavis : जगात हिंदू अर्थव्यवस्थेची थट्टा उडवली, पण 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल, WHEF मध्ये फडणवीसांनी व्हिजन मांडलं
जगात हिंदू अर्थव्यवस्थेची थट्टा उडवली, पण 'हिंदू ग्रोथ रेट' जगाला दिशा देईल, WHEF मध्ये फडणवीसांनी व्हिजन मांडलं
Indian Cricketers Who have acted in Movie : भज्जी ते शिखर धवनपर्यंत! या 10 क्रिकेटपटूंनी अभिनयातही हात आजमाजवला; एकाने खलनायक साकारत खळबळ उडवून दिली
भज्जी ते शिखर धवनपर्यंत! या 10 क्रिकेटपटूंनी अभिनयातही हात आजमाजवला; एकाने खलनायक साकारत खळबळ उडवून दिली
Sanjay Raut on Sharad Pawar : शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
शरद पवार भाजपसोबत जाणार? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, धर्मांध शक्तीपासून दूर...
Who Is Paddy Upton : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड चॅम्पियन, हॉकी टीमला ऑलिम्पिक मेडल अन् आता डी गुकेश बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन! तिन्ही यशांमधील 'महानायक' कोण?
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Embed widget