Muhammad Rafi : पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार
Muhammad Rafi : पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Muhammad Rafi : 2021 च्या मोहम्मद रफी पुरस्काराचं वितरण करण्यात आले आहे. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि कविता कृष्णमूर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी मोहम्मद रफी यांच्या दोन मुली नसरीन आणि जफ्रिन या मंचावर उपस्थित होत्या. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना गौरवण्यात आले आहे.
मुंबईच्या रंग शारदा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
पुन्हा पुन्हा मोहम्मद रफी जन्माला यावेत अशी प्रार्थना करुयात असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्याचे हे चौदावे वर्ष असून एक लाख रू. रोख, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, 51 हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी रफी यांच्या अनेक आठवणींना उजाळादेखील दिला. पंडित ह्रदयनाथ मंगेशकर पुरस्कार स्विकारताना म्हणाले,"मला आनंद होत असून रफी ही एक संगीताला लाभलेली दैवी देणगीच होती. ते कलावंत म्हणून मोठे होते तेवढेच माणूस म्हणूनदेखील मोठे होते".
संबंधित बातम्या
Bigg Boss Marathi 3 : येत्या रविवारी रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले
Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' झळकणार रुपेरी पडद्यावर
Gadar 2 : Sunny Deol च्या 'गदर 2' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात, तारा सिंहच्या फर्स्ट लूकची चाहत्यांमध्ये चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha