Mount Mary Fair 2022 : दोन वर्षानंतर होणार माऊंट मेरीची जत्रा; 'मोत माऊली'च्या दर्शनाला दररोज लाखापेक्षा अधिक भाविक येणार
Mount Mary Fair : 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरीची जत्रा होणार आहे. या जत्रेला दररोज लाखापेक्षा अधिक भाविक येणार आहेत.
Mount Mary Fair 2022 : 'माऊंट मेरी जत्रा' (Mount Mary Fair 2022) दोन वर्षानंतर आता 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या जत्रेला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव (Brandra Fest) म्हणूनदेखील ओळखलं जातं. आता दोन वर्षानंतर ही जत्रा होणार असल्याने दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
'माऊंट मेरी जत्रे'चे यंदा प्रथमच युट्बूब आणि ट्विटरवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष या यात्रेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं. या यात्रेला शतकाहून अधिक परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच आता ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
चर्च ऑथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जत्रेला एक लाख भाविक दर्शनासाठी आणि जत्रेसाठी येतील अशी शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
कोविडविषयक बंधने शिथील झाल्यामुळे व धार्मिक स्थळे जनसामान्यांसाठी खुली केल्यामुळे तसेच सर्व सण, महोत्सव, जत्रा, यात्रा निर्बंधमुक्त झाल्यामुळे सालाबादप्रमाणे या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 2020 आणि 2021 साली कोरोनामुळे जत्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुविधा -
- 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
- रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था
- भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था
- अनधिकृत स्टॉल्स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्जाव
- 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत
- प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधांकडे लक्ष
- देखरेख कक्ष आणि निरिक्षण मनोरा
संबंधित बातम्या