एक्स्प्लोर

VIDEO : 'मुंबई भाजपची, मुंबई मारवाड्यांची, आता मारवाडीतच बोलायचं'; मराठी महिलेवर अरेरावी, मारवाडी दुकानदाराला मनसैनिकांनी धुतलं

MNS Worker Beaten Marwadi Shop Owner : मुंबईत आता मारवाडी भाषा बोलायची अशी सक्ती एका दुकानदाराने मराठी महिलेवर केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

मुंबई : मुंबईत आता भाजपची सत्ता आल्याने मराठी बोलायचं नाही, मारवाडीतच बोलायचं असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. मराठीत बोलणाऱ्या महिलेवर मारवाडीत बोलण्याची सक्ती या दुकानदाराने केली होती. गिरगावातील खेतवाडीमध्ये ही घटना घडली असून मनसैनिकांनी चोपल्यानंतर त्या दुकानदाराने मराठी माणसांची माफी मागितली आहे. या संबंधित व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

खेतवाडीमध्ये एक मराठी महिला दुकानात गेली असताना त्या दुकानदाराने तिला मराठीत का बोलली म्हणून जाब विचारला. महाराष्ट्रात आता भाजपचं सरकार आहे, असं सांगत त्याने महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यास सांगितलं.   'बीजेपी आया है, मारवाडी में बात करनेका. मुंबई बीजेपी का, मुंबई मारवाडी का' असं त्या दुकानदाराने त्या महिलेला म्हटलं. 

लोढांनी उद्धट उत्तर दिल्याचा दावा

त्यानंतर संबंधित महिला न्याय मागण्यासाठी भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेली. पण लोढांनी तिला उद्धट उत्तर दिल्याचा दावा त्या महिलेने केला. तुम्ही आमच्यात भांडण लावताय असं म्हणत लोढांनी आपल्याला ओळखायलाही नकार दिल्याचं त्या महिलेने सांगितलं. 

मनसेकडे तक्रार

त्यानंतर त्या महिलेने खेतवाडी मनसे कार्यालयाकडे याची तक्रार केली. तक्रार मिळतात मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला बोलावून घेतलं आणि जाब विचारला. त्यावर आपण त्या महिलेला मारवाडीत बोलायला सांगितल्याचं दुकानदाराने मान्य केलं. त्यानंतर मनसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. 

दुकानदाराची माफी

मनसैनिकांनी चोप देताच त्या दुकानदाराने आपली चूक मान्य केली आणि मराठी माणसाची माफी मागितली. पुन्हा आपल्याकडून असं होणार नाही अशी ग्वाहीही त्या महिलेने दिली. 

आपल्याच मुंबईमध्ये मराठीत बोलू नका असं सांगितलं जातंय. त्यावर न्याय मागायला आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेल्यावर त्यांनी ओळखही दाखवली नाही. उलट उद्धट उत्तर दिलं. आता मराठी माणसाने कुठे जायचं? असा सवाल त्या मराठी महिलेने केला. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Embed widget