एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चोरून फक्त छक्के घेऊन गेले, मनसेची पोस्टरबाजी
मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालं. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर पोस्टर्सच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
मुंबई : मनसेने दादर परिसरात पोस्टरबाजी करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’, असा मथळा छापलेले पोस्टर्स दादर भागात लावण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक फोडून, शिवसेनेने मास्टरस्ट्रोक मारला आहे. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांना फोडण्यात शिवसेनेला यश मिळालं. त्यानंतर मनसेने आता शिवसेनेवर पोस्टर्सच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
मनसेचे मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याने संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक सध्या मनसेसोबत आहेत. संजय तुर्डे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीनंतर विरोधी उमेदवाराकडून हल्ला झाला होता. पक्षासाठी हल्ला सहन करणारे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे मनसेसोबत आहेत.
भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/919394150600118272
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.
संबंधित बातम्या :
माफियांच्या पैशांवर शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी : किरीट सोमय्या
घोडेबाजारी केल्याचा आरोप गाढवांनी करु नये : उद्धव ठाकरे
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या!
फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement