एक्स्प्लोर

Mumbai BEST Bus : मुंबईतील बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर? बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या अवघ्या 249 बसेस; एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरात धक्कादायक माहिती

Mumbai BEST Bus : बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या केवळ 249 बसेस आहेत. तर या उलट कंत्राटदारांकडील तब्बल 2500 बसेसच्या (BEST Bus) जीवावर बेस्टची सेवा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde : बेस्ट सेवा खासगीकरणाच्या उंबरठ्यावर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लेखी उत्तरात धक्कादायक माहिती

पुढे आलेल्या माहितीनुसार, बेस्टच्या मालकीच्या बस संख्येत झपाट्याने घट होत आहे. एप्रिल 2024 मध्ये बेस्टच्या 1098 बस सेवेत होत्या. हीच संख्या आता कमी होऊन एप्रिल 2025 मध्ये 757 होती, तर सद्यस्थितीत मात्र बेस्टच्या स्वतःच्या केवळ 249 बसेस सेवेत उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत लेखी उत्तरात हि माहिती दिली आहे.

Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

एसटीच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे शासनाने ती जबाबदारी उचलावी. अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली होती. त्यानुसार त्यांच्या अनुमतीने दरमहा सुमारे 65 कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला द्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या सोबत घेतलेल्या बैठकीमध्ये दिले होते.

सदर थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनात सोबत देण्यास सुरुवात झाली. तथापि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे थकीत हप्ता न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात नाराजी पसरली. अशा परिस्थितीत काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. सदर गंभीर परिस्थिती ओळखून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचीशी चर्चा करून या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत अशी विनंती केली. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे त्या २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले असून उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील असे ठाम आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाच्या वतीने दिले आहे. तसेच सध्या दहावी व बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे. असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget