एक्स्प्लोर
मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश, राज ठाकरेंना जोरदार धक्का
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज मनसेला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

फोटो सौजन्य : राजेश वराडकर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज मनसेला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरमधील शिवसेना भवनमध्ये मनसे आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी सोनावणे म्हणाले की, "आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता सर्वजण स्वगृही परतले आहेत. राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींनी मला खुप प्रेम दिले आहे. मी पक्षावर नाराज नाही. फक्त मला स्वगृही परतण्याची ओढ लागली होती. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी केवळ शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम केलं आहे."
व्हिडीओ पाहा
दिड वर्षांपूर्वी मनसेच्या मुंबईतली सहा नगसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आज मनसेच्या एकमेव आमदाराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सोनावणे यांच्या शिवसेना प्रवेशावर जुन्नरमधील स्थानिक शिवसेना नेते नाराज आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
