एक्स्प्लोर

जेल की, बेल? महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते देशपांडे, धुरींच्या जामीनावर आज फैसला

MNS Leader Sandeep Deshpande : महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींची सत्र न्यायालयात धाव, अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी.

MNS Leader Sandeep Deshpande : काही दिवसांपूर्वी मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेनं (MNS) आंदोलन केलं होतं. त्यावेळी महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एवढंच नाहीतर संदीप देशपांडे, संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला. तेव्हापासूनच मुंबई पोलिसांकडून त्यांची शोधाशोध सुरू आहे. पण बेपत्ता असलेल्या दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला भोईवाडा कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मेचा अल्टिमेटम दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन्ही नेत्यांनी कारमधून पळ काढला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. दरम्यान, आज सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यास संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल कामाला लागली आहे. तर, दुसरीकडे देशपांडे यांच्या शोधासाठी मुंबई क्राईम ब्रांचकडून विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. मुंबईसह उरण, कर्जत भागात या दोघांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 4 मे रोजी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थाबाहेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न असताना देशपांडे आणि धुरी पोलिसांना गुंगारा देत निसटले होते. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून देशपांडे पोलिसांच्या रडारवर आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये मनसेचे नेते दिलीप दातार यांना अटक करण्यात आली आहे. भोंग्यांविरोधातील आंदोलनानंतर ही अटक करण्यात आली आहे.  

नेमकं काय घडलं? 

मुंबईतील शिवाजी पार्क राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितलं. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी गाडीत बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडी न थांबवताच ते तिथून निघून गेले. त्यांची गाडी भरधाव वेगानं जात असताना एक महिला पोलीस जखमी झाली. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं. पण पोलिसांनी याप्रकरणी संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत. एवढंच नाहीतर संदीप देशपांडेंना शोधण्यासाठी पोलीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरही पोहोचले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget