एक्स्प्लोर

'मुंबई मेट्रोच्या कामावर ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू होत नाहीत'

मुंबई मेट्रो-3 प्रकल्पा करता ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू होत नाहीत, असा दावा मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणानं उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो-3 प्रकल्पाच्या रात्री होणाऱ्या कामावर बंदी घातली आहे. यावर मेट्रो प्राधिकरणानं आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो-3 प्रकल्पा करता ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू होत नाहीत, असा दावा मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणानं उच्च न्यायालयात केला आहे. तसेच मेट्रो 3 प्रकल्प हा लोकांच्या हितासाठी सुरू आहे. मेट्रो कायद्यानुसार या प्रकल्पावर पर्यावरण संवंर्धन कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, असं एमएमआरसीएलच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो-3 प्रकल्पाच्या रात्री होणाऱ्या कामावर बंदी घातली आहे. यावर मेट्रो प्राधिकरणानं आपली भूमिका उच्च न्यायालयात मांडली आहे. यावर लवकरच सुनावणीची अपेक्षा आहे. दक्षिण मुंबईतील रॉबिन जयसिंघानी या रहिवाश्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला सध्या रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत काम करण्यास बंदी घातली. त्यामुळे मेट्रो 3 प्रकल्पासाठीची नाईट शिफ्ट सध्या बंद आहे. जयसिंघानी यांनी आपल्या याचिकेद्वारे, मेट्रोच्या कामामुळे तिथल्या रहिवाश्यांना प्रचंड त्रास होत असल्याचं म्हणलंय. मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाकडून निवासी विभागातील ध्वनी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्या जात आहेत. पोलीस आणि संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्राधिकरणाने दिवसाला 10 हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. यावर मेट्रो रेल प्राधिकरणानं आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, दिवसा हा संपूर्ण परिसर लोकांच्या गर्दीनं गजबजलेला असतो. त्यामुळे काँक्रिटीकरणाचं काम रात्रीच्या वेळेस करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर हे काम करताना कुणाला त्रास होणार नाही, याची काळजीही घेतली जात आहे. संपूर्णपणे भुयारी मार्गातून जाणाऱ्या या प्रकल्पाच्या कामात अवजड यंत्रसामुग्री वापरली जाते आहे. मात्र, कालांतराने आवाजाची पातळी कमीच होणार आहे. तसेच याचिकाकर्ता जयसिंघानी यांच्या घराच्या परिसरात आवाजाची पातळी मर्यादेतच आहे. त्यामुळे ही जनहित याचिका नसून वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणं अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget