एक्स्प्लोर

वय 10 ते 15 वर्षे, बाईक चोरी करणाऱ्या टोळीला अटक

ही मुलं बाईक चालवून त्यातलं पेट्रोल संपलं, की ती एखाद्या सुरक्षित ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन बाईक चोरी करायचे.

ठाणे : बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून बाईक चोरी करणाऱ्या 10 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलांना अटक करण्यात आली आहे. ही मुलं बाईक चालवून त्यातलं पेट्रोल संपलं, की ती एखाद्या सुरक्षित ठिकाणी लावून ठेवायचे आणि पुन्हा नवीन बाईक चोरी करायचे. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं, असा हा प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यात घडला. काय आहे प्रकरण? मुंब्रा आणि परिसरात गेल्या काही दिवसात बाईक चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. बाईक चोरी ही साधारणपणे पैशासाठीच होत असल्याने चोरटे चोरीच्या बाईक विकतात आणि पुन्हा नवीन सावज शोधतात, असा पोलिसांचा आजवरचा अनुभव. पण मुंब्रा परिसरात मागील काही दिवसात झालेल्या बाईक चोऱ्यांनी पोलिसांना चिंतेत टाकलं होतं. कारण या चोरी झालेल्या बाईक पेट्रोल संपलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडत होत्या. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर पोलिसांना आणि समस्त पालकवर्गाला चिंतेत टाकणारं एक धक्कादायक वास्तव समोर आलं. कारण, ही बाईक चोरणारी टोळी म्हणजे प्रत्यक्षात पाचवी ते दहावीच्या वर्गात शिकणारी लहान मुलं होती. फक्त बाईक चालवण्याची मजा घेता यावी म्हणून ते या बाईक चोरी करत होते. पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद मुंब्रा, कळवा आणि डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत तपास केल्यानंतर कुठेही चोरी झालेल्या बाईक विकल्या गेल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोण करतंय? याचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं. अखेर गस्त वाढवल्यावर आणि बाईक चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यावर पोलिसांना या गुन्ह्याचा उलगडा करता आला. मुंब्रा परिसरात राहणारी अवघी 10 ते 15 वर्षांची मुलं पार्किंगमधून या बाईक चोरी करायचे. उद्देश एकच, बाईक चालवण्याची मजा घेता यावी. या लहान मुलांची उंची कमी असल्याने अॅक्टिव्हा, स्कुटी अशा बाईक्सना ते प्राधान्य द्यायचे. एका 'मास्टर की'च्या साहाय्याने बाईकचं हॅन्डल ओपन झालं, की प्लगच्या वायर्स जोडून ते या बाईक सुरू करायचे आणि पेट्रोल संपेपर्यंत बाईक चालवण्याचा आनंद घ्यायचे. बाईकमधलं पेट्रोल संपलं, की ती बाईक व्यवस्थित कुठेतरी लावून ठेवत पुन्हा नवीन बाईक शोधायचे. केवळ जॉय राईडसाठी अशाप्रकारे या मुलांनी तब्बल 7 लाख 60 हजार रुपयांच्या बाईक चोरल्या होत्या. याबाबत पोलिसांनी तपास करून 27 बाईक हस्तगत केल्या आणि सोबतच या बाईक चोरणाऱ्या या नऊ लहान मुलांना अटक केली. अटक केलेली ही सगळी मुलं अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर पालकांची चिंता वाढली असून पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ही मुलं आपल्या मोहापायी आज अडचणीत सापडले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget