एक्स्प्लोर

आम्ही मिहीरला घेऊन पळून गेलो कारण... बहिणीनं सांगितलं कारण; कावेरी नाखवांच्या मारेकऱ्याची महत्त्वाची कबुली

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) आरोपी मिहीर शाहानं कबुलीनामा दिला आहे.

Worli Hit And Run Case: मुंबई : वरळी (Worli Accident) हिट अँड रन प्रकरणी (Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबतच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मिहीरला अटक झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हे शाखा 3 मध्ये मिहीरसोबतच आई, दोन बहिणी आणि मित्रांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 

वरळी हिट अँड रन प्रकरणात (Worli Hit And Run Case) आरोपी मिहीर शाहानं कबुलीनामा दिला आहे. अपघातावेळी गाडी चालवत असल्याची कबुली मिहीर शाहानं मुंबई पोलिसांना दिली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी अटकेनंतर आरोपी मिहीर शाहानं दिलेल्या कबुलीमध्ये, घटनेच्या वेळी तोच गाडी चालवत होता, असं त्यानं सांगितलं आहे. त्यासोबतच मिहीरच्या बहिणीनं या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भितीनं आम्ही घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. मिहीर आणि त्याचं कुटुंब दोन गाड्यांनी शहापूरला गेलं. शहापूरला एका पंजाबी व्यक्तीनं त्यांची शहापूरला राहण्याची व्यवस्था केली. या पंजाबी व्यक्तीचे शाह कुटुंबियाशी जुनं आणि घरचे संबध असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. फरार होण्यापूर्वी आरोपीनं दाढी मुंडवली असल्याचा पोलिसांना संशय आहे. जेणेकरून त्याला ओळखता येणार नाही. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना सापडलेल्या कालखंडाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची चौकशी केली आणि सर्व वेळापत्रकाची पुष्टी केली. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीनं आपणच ड्रायव्हिंग सीटवर बसल्याची कबुली दिली आहे. या घटनेनंतर तो खूप घाबरला आणि त्यांचे वडील राजेश शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तो तेथून निघून गेल्याचं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. याशिवाय हा मुलगा कुटुंबापासून विभक्त होऊन विरारच्या दिशेने का आला? याचाही तपास पोलीस करणार आहेत. मुख्य आरोपीला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस आरोपींची कोठडी मागणार आहेत. तसेच, पोलिसांनी आरोपी मिहीरच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत.

राजेश शाहांची शिवसेनेतून हकालपट्टी 

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील, राजेश शाह यांची शिवसेना उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी हिट अँड रन अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटात राजेश शाह शिवसेना उपनेते पदावर होते. त्यांचा मुलगा मिहीर शाह यानं भरधाव गाडीनं वरळीत एका महिलेला चिरडल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

पाहा व्हिडीओ : Worli Hit And Run Case : आरोपीसोबतच आई, बहीण आणि मित्रांचेही नोंदवले जबाब 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मोठी बातमी : Worli Hit & Run : राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
एसटीच्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास; प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार मिळणार, प्रताप सरनाईकांची माहिती
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Mumbai Crime News: 'रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी', मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत सांगितली काळीज चिरणारी व्यथा
'रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी', मुंबईतील डॉक्टरने शेवटच्या चिठ्ठीत सांगितली काळीज चिरणारी व्यथा
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
इराणविरोधात युद्ध, अमेरिका आणि इस्त्रायलवर इटलीच्या पीएम मेलोनी भडकल्या; नेमकं काय म्हणाल्या? नाटो सदस्य असूनही स्पेनच्या धाडसाची सुद्धा जगभरात चर्चा
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग, अग्निशमन दलाची धाव; जाळ अन् धुराचे लोट
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Embed widget