मोठी बातमी! म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ, एवढ्या कोटींचा भुर्दंड होणार माफ; मंत्री अतुल सावेंची घोषणा
म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ (Service charge waived) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामुळं मुंबईतील लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
![मोठी बातमी! म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ, एवढ्या कोटींचा भुर्दंड होणार माफ; मंत्री अतुल सावेंची घोषणा MHADA News Service charge waived for 56 colonies of MHADA says minister Atul save मोठी बातमी! म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ, एवढ्या कोटींचा भुर्दंड होणार माफ; मंत्री अतुल सावेंची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/12/766330b740b18bca8468256c3f7d2ff61702401322894290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MHADA : म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ (Service charge waived) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Minister Atul save) यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळं मुंबईतील (Mumbai)लाखो रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. यामुळं तब्बल 384 कोटींचा भुर्दंड माफ होणार आहे.
मुंबईतील सर्व आमदारांनी म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करावं याबाबतची मागणी केली होती. विशेषत आमदार प्रविण दरेकर यांनी मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये आम्ही म्हाडाच्या (MHADA) 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी एबीपी माझाला दिली. पूर्वी सेवा शुल्क वाढले होते. 50 टक्के शुल्क झाले होते. त्यामुळं सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता. त्यामुळं आम्ही बैठकीत सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी विधानसभेत मागणी केली होती. त्यावर आम्ही निर्णय घेतल्याचे सावे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी एक महिना मुदतवाढ, MHADA चे विशेष अधिवेशन 14 जानेवारीपर्यंत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)