एक्स्प्लोर

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी एक महिना मुदतवाढ, MHADA चे विशेष अधिवेशन 14 जानेवारीपर्यंत 

MHADA Campaign : यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे विशेष मोहीम सुरू आहे. 

मुंबई: राज्य सरकारकडून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडातर्फे (MHADA) आयोजित विशेष अभियानाला आता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 14 जानेवारी 2024 पर्यंत आता पात्रता निश्चितीचे अभियान राबवलं जाणार आहे. 

बृहन्मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत आणि यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाीन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 14 जानेवारी 2024 पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही 

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबर 2023 पासून राबविण्यात येणार्‍या या विशेष अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. 

या साईटवर सुविधा उपलब्ध

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने मुंबईतील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळ असणाऱ्या समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी Mill workers eligibility हे मोबाइल ॲप तयार करण्यात आले असून सदर ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. तसेच https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 
           
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण 95,812 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 72,041 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/ अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.       
           
यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या  वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
           
मंडळातर्फे सर्व संबंधित गिरणी कामगार व वारसांना आवाहन करण्यात येत आहे की, पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी   क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे.  सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania: डीबीटीच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर,  दुप्पट दराने  खरेदी,  मुंडेंवर गंभीर आरोपIndrajeet Sawant : महाराज आग्र्याहून सुटताना Rahul Solapurkar तिथे होता का? : इंद्रजीत सावंतABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 04 February 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सAmbernath Girl Murder : प्रेमप्रकरण ते हत्या,अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Dhananjay Munde: आता सरकारने अंजली दमानियांना विचारुन खरेदीच्या किंमती ठरवायच्या का? धनंजय मुंडे आरोपांवरुन संतापले, म्हणाले....
अंजली 'बदनामिया'! धनंजय मुंडेचा पलटवार, म्हणाले, मी शांत बसलोय असं कोणीही समजू नका
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले?
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, 10 टक्के खर्च आरोग्यावर : भूषण गगराणी
Embed widget