एक्स्प्लोर

Mhada Lottery 2023 :म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत वेटिंगवर तर जालन्यातील आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते

म्हाडाच्या (Mhada) घरांसाठी सोडत करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हाडाच्या यादीत वेटिंगवर  आहेत.

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी सोडत करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हाडाच्या यादीत वेटिंगवर  आहेत. तर भाजप आमदार नारायण कुचे यांनी बाजी मारली आहे. साडेसात कोटींच्या घरावर कुचे यांना आमदार/खासदारांच्या कोट्यातून सदनिका लागली आहे. 

नारायण कुचे बदनापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळात ताडदेव परिसरातील क्रिसेंट टॉवरमध्ये साडे सात कोटी रुपयांचं आलिशान घर होतं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते.

4 हजार 83 घरांसाठी सोडत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (14 ऑगस्ट)  सोडत काढण्यात आली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये दुपारी दोन वाजता ही सोडत करण्यात आली. या सोडतीत तब्बल एक लाख 20 हजार 144 अर्जदार सहभागी झाले होते. ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते. 

22 मे रोजी 4083 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन इथे उभारण्यात आलेल्या 4083 घरांच्या विक्रीसाठी ही सोडत निघाली आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 

लोकप्रतिनिधी यांना म्हाडाच्या सोडतीत आरक्षण कशाला असा प्रश्न उपस्थित करत याला काही दिवसांपूर्वी विरोध करण्यात आला होता. लोकप्रतिनिधींसाठीचे आरक्षण रद्द करण्याची मागणी अनकेदा झाली. दरम्यान जून महिन्यात लोकप्रतिनिधी यांच्यासह राज्य-केंद्र सरकारी कर्मचारी आणि म्हाडाचे कर्मचारी यांना म्हाडाच्या गृहप्रकल्पात असलेले 11 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी अत्यल्प गटात मोडत नसल्याने हे आरक्षण रद्द करण्यात आले. या बाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र यावर अजूनही निर्णय झालेला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mhada Lottery 2023 : अखेर प्रतीक्षा संपली, म्हाडाच्या मुंबईतील 4083 घरांसाठी आज सोडत!

Mhada Lottery 2023: चक्क केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज; 'या' आजी-माजी आमदारांचेही अर्ज

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget