एक्स्प्लोर

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील 4082 घरांसाठी सव्वा लाख अर्ज; सोडत कधी? म्हाडाने सांगितले...

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई विभागातील 4080 घरांसाठी एक लाख 20 हजार 849 अर्जदार पात्र ठरले आहेत.

Mhada Lottery 2023 : मोठ्या कालावधीनंतर म्हाडाच्यावतीने मुंबईतील घरांसाठी सोडत (Mhada Lottery 2023) काढण्यात येणार आहे. मुंबईतील या घरांसाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. म्हाडाच्या मुंबई  गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन, येथे उभारण्यात आलेल्या 4 हजार 82  सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त झालेल्या 1 लाख 45 हजार 849 अर्जांपैकी  अंतिमतः 1 लाख 20 हजार 144 अर्ज पात्र ठरले आहेत. आता हे अर्ज संगणकीय सोडतीत  सहभागी होणार आहेत.  या माध्यमातून मंडळाकडे अंदाजे 519 कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा झाली आहे. अर्ज प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा मंडळातर्फे तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती 'म्हाडा'च्यावतीने देण्यात आली आहे. सोडतीचे स्थळ व तारीख मंडळातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

पात्र अर्जदारांची यादी जाहीर

मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीत सहभाग घेणार्‍या पात्र अर्जदारांची सूची म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in  या संकेतस्थळावर आज 28 जुलैपासून दुपारी 3 वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 22 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली होती. मुंबई मंडळाच्या सदनिका विक्री सोडतीला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. 11 जुलै 2023 या सोडत प्रक्रियेच्या शेवटच्या दिवसापर्यंत संगणकीय सोडत प्रणालीमध्ये 1 लाख 45 हजार 849 अर्ज प्राप्त झाले होते. तर, 1 लाख 22 हजार 319 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला होता. अर्जांच्या छाननी प्रक्रियेअंती 2175 अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती मंडळातर्फे सकारण म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोणत्या गटासाठी किती प्रतिसाद? 

मुंबई मंडळातर्फे विक्री करिता जाहीर करण्यात आलेल्या 4082 सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे.  प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता 22 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील 843 सदनिकांसाठी 28 हजार 862 अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवार नगर विक्रोळी या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. या ठिकाणी 415 घरे आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील 1034 सदनिकांसाठी 60 हजार 522 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगाव या योजनेकरिता आहेत. या ठिकाणी 416 घरे आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील 138 सदनिकांसाठी 8395 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील 120 सदनिकांसाठी 2068 अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता असल्याची माहिती म्हाडाच्यावतीने देण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget