एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
म्हाडाकडे मुंबईकरांची पाठ, अर्जांची संख्या निम्य्याने घटली
म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या यंदा निम्म्यानं घटली आहे.
![म्हाडाकडे मुंबईकरांची पाठ, अर्जांची संख्या निम्य्याने घटली Mhada Lottery 2017 Mhada Applications Reduced This Year म्हाडाकडे मुंबईकरांची पाठ, अर्जांची संख्या निम्य्याने घटली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/11180653/mhada_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत यंदा म्हाडाच्या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या यंदा निम्म्यानं घटली आहे.
घरांची अपुरी संख्या आणि वाढलेल्या किंमती यामुळे कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतंय.
म्हाडाच्या घरांसाठी गेल्या वर्षी एक लाख 35 हजार अर्ज आले होते. मात्र काल संध्याकाळपर्यंत 71 हजार 319 इच्छुकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत, तर प्रत्यक्षात 42 हजार 751 जणांनीच बँकेमार्फत पैसे भरले आहेत.
म्हाडाच्या यंदाच्या घरांच्या सोडतीसाठी नोंदणी करण्याची वाढीव मुदत काल संपली.
NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी चलन निर्मिती दि. २५ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन पेमेन्ट स्वीकृती दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत करता येणार आहे. NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरणा दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संबंधीत बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
*ऑनलाईन अर्ज नोंदणीची शेवटची तारीख
पूर्वी – 21/10/2017 होती ती आता 23/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
पूर्वी 22/10/2017 होती ती आता 24/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी चलन निर्मितीची अंतिम दिनांक
पूर्वी 23/10/2017 होती ती आता 25/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
*ऑनलाईन पेमेंट स्विकृती अंतिम दिनांक
पूर्वी 24/10/2017 होती ती आता 26/10/2017 (रात्री 11.59 वा पर्यंत) करण्यात आली आहे.
* RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी अंतिम दिनांक
पूर्वी 24/10/2017 होती ती आता 26/10/2017 (बँकांच्या वेळेत) करण्यात आली आहे.
लॉटरी सोडत – 10 नोव्हेंबर 2017
म्हाडा लॉटरी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 घरांसाठी ही लॉटरी असेल. 10 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात संगणकीय सोडत काढण्यात येईल.
सदर सोडतीकरिता जाहिरात शुक्रवार, दि. 15 सप्टेंबर 2017 रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
कुठे किती घरं?
अत्यल्प गट 8 घरं : प्रतीक्षा नगर- सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरिवली
अल्प उत्पन्न गट 192 घरं: कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड
मध्यम उत्पन्न गट 281 घरं: प्रतीक्षा नगर- सायन, सिद्धार्थ नगर – गोरेगाव (पश्चिम), उन्नत नगर- गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाड नगर- मालवणी मालाड
उच्च उत्पन्न गट 338 घरं: लोअर परेल – मुंबई, तुंगा – पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली – कांदिवली (पश्चिम)
कोणत्या गटासाठी किती घरं?
- अत्यल्प उत्पन्न गट – 8 घरं
- अल्प उत्पन्न गट – 192 घरं
- मध्यम उत्पन्न गट – 281 घरं
- उच्च उत्पन्न गट – 338 घरं
- एकूण – 819
- अत्यल्प उत्पन्न गट – 15 हजार 336 रुपये
- अल्प उत्पन्न गट – 25 हजार 336 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 50 हजार 336 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 75 हजार 336 रुपये
- अत्यल्प उत्पन्न गट – 25,000
- अल्प उत्पन्न गट – 25001 ते 50000 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 50,001 ते 75,000 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 75,001 पेक्षा जास्त
- अत्यल्प उत्पन्न गट : 15 ते 20 लाख रुपयांदरम्यान
- अल्प उत्पन्न गट : 23 ते 35 लाख रुपयांदरम्यान
- मध्यम उत्पन्न गट : 36 लाख ते 56 लाख रुपये
- उच्च उत्पन्न गट : 72 लाख ते 1 कोटी 96 लाख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)