एक्स्प्लोर
Advertisement
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत आणि सीएसएमटी मुंबई-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत आणि सीएसएमटी मुंबई-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
ठाणे अप धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येतील आणि मुलुंड स्थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. त्यानंतर अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.
अप धीम्या मार्गावरील लोकल ठाकुर्ली, कोपर आणि मुंब्रा स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे येथील प्रवाशांना ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांहून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सकाळी 10.05 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या गाड्या निर्धारित स्थानकांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबतील. शिवाय लोकल 15 मिनिटे उशिरा धावतील, असंही मध्य रेल्वेकडून कळवण्यात आलं आहे.
हार्बर लाईन
मेगाब्लॉक काळात सीएसएमटी आणि वडाळ्याहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला सोडण्यात येणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात येतील. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांना मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement