एक्स्प्लोर
मुंबईत आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक
मुंबई : पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गांवर आज सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 या दरम्यान डाऊन फास्ट मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.
त्यामुळे डाऊन स्लो मार्गावरील लोकल गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. मात्र प्रवाशांना कल्याण, डोंबिवली आणि दिवा स्थानकांतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
सीएसटीहून सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 या वेळेत डाऊन फास्ट मार्गावरुन सुटणाऱ्या सर्व लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड, दिवा येथे थांबतील. अप फास्ट लोकल गाड्यांना सकाळी 11 ते दुपारी 3.08 या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबे असतील. त्यामुळे या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.
सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या स्लो लोकल सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत दहा मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बरवर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत बंद असेल. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेवरुन प्रवास करु शकतात.
पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
ब्लॉकदरम्यान अंधेरी ते बोरिवली दरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे.
ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही मेल-एक्स्प्रेस गाड्या अंधेरी ते बोरिवलीमध्ये स्लो मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement