पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य
गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
![पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य Maybe Pakistan-occupied Kashmir will come to India by 2024, says Union Minister of State Kapil Patil पाकव्याप्त काश्मीर 2024 पर्यंत भारतामध्ये येईल; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/30/1dc6c6fafbc777c7854d2ddc9a7a717d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे विधान केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे. तर आता आपण वाट बघूया कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ मोदी करू शकतात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत हे मत व्यक्त केले आहे.
काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते अशी आठवण पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितली. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय अशी आठवण कपिल पाटील यांनी सांगितले.
कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत
कपिल पाटील म्हणाले की, कांदे बटाटे, तूरडाळ, मुगडाळ यांच्या महागाईतून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करू शकणार नसून कांदे बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नसल्याचेही केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
- Bigg Boss 15 Finale : रश्मी देसाई बिग बॉसमधून आऊट, रविवारी होणार महाअंतिम सोहळा
- Amol Kolhe : 'नथुराम'ची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे गांधींच्या चरणी; आत्मक्लेश करत व्यक्त केली दिलगिरी
- Raj Kundra : राज कुंद्राची इन्स्टाग्रामवर 'घर वापसी'; 'या' नावाने उघडलं अकाऊंट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)