एक्स्प्लोर
वेळेत पैसे परत न केल्याने कल्याणमध्ये महिलेला सावकाराकडून मारहाण
कल्याण : सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्यामुळे एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. सासऱ्याने घेतलेले पैसे परत न केल्याने दमदाटी करत मंजुळा यादव नावाच्या महिलेसह तिच्या पतीलाही बेदम मारहाण झाली आहे.
डोंबिवलीतील टाटा पावर हाऊस परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने व्याजावर 40 हजार रुपये घेतले होते. पैसे परत न केल्यामुळे सावकाराने त्याच्या सुनेसह मुलाला मारहाण केली आहे. या कुटुंबाचा दुधाचा व्यवसाय आहे. मारहाणीवेळी महिला दुधाच्या डेअरीमध्ये होती. महिला आणि तिच्या पतीला मारहाण करत दुकानाची तोडफोड केली आणि दुकान बंद केलं.
या मारहाणप्रकरणी सावकार राहुल कमतकरवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल हा एका माजी नगरसेवकाचा भाचा असल्याचंही बोललं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
वर्धा
भारत
Advertisement