एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवासी डॉक्टर आजपासून कामावर रुजू
मुंबई : डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीविरोधात सुरु असलेलं मार्डचं कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आंदोलन मागे घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र मार्डनं काल हायकोर्टात सादर केलं होतं. आज शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मार्डचे डॉक्टर कामावर रुजू होणार आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेलं मार्डचं आंदोलन संपुष्टात आलं आहे.
सकाळी 8 वाजता सगळ्या डॉक्टरांनी कामावर हजर व्हा. अन्यथा सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्यास मोकळीक असेल असा सज्जड इशारा शुक्रवारी हायकोर्टानं मार्डच्या डॉक्टरांना दिला होता. हायकोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मार्डनं डॉक्टरांना सकाळी 8 वाजता कामावर हजर राहण्याचे निर्देश देत असल्याचं म्हटलं होतं. जे डॉक्टर कामावर हजर राहणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकार किंवा पालिका प्रशासन कायदेशीर कारवाई करु शकते, असंही मार्डनं मान्य केलं आहे.
मार्डच्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं डॉक्टरांना फटकारलं होतं. त्यानंतर संपकरी डॉक्टरांचा अडेलतट्टूपणा कमी झाला आहे.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद होती. या रुग्णालयात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होती. राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प झाली होती. मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय? – डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा – डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी – निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा – सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा संपकाळात राज्यभरात किती रुग्ण दगावले? डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात 377 रुग्ण दगावल्याची माहिती वकिलांनी मुंबई हायकोर्टात दिली. तसंच मुंबईत डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी सरकारी रुग्णालयातील 181 रुग्ण दगावल्याचा दावाही वकिलांनी केला.डॉक्टरांच्या संपामुळे 380 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती
उपचाराअभावी रुग्णांचा अंत दरम्यान, उपचाराअभावी बीएमसीच्या तीन रुग्णालयांमध्ये 135 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये केईएममधील 53,नायर 34 आणि सायन रूग्णालय 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती वकिलांनी दिली. इतकंच नाही तर राज्यभरातील रुग्णालयातील 380 जणही उपचाराअभावी दगावल्याचा दावा, वकिलांनी केला. मुख्यमंत्र्यांचाही दम जनतेच्या पैशातून सरकारी डॉक्टरांच्या शिक्षणाचा खर्च होतो. त्याच जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आज शेवटचं सांगतोय, हात जोडतो, कामावर परत या, शपथेला विसरु नका, देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक डॉक्टरांना दिला. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा विधानसभेत डॉक्टरांच्या संपाबाबत निवेदन दिलं.संबंधित बातम्या
ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट ‘मार्ड’कडून संप मागे, डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन कोर्टाच्या आदेशानंतरही डॉक्टर लेखी आश्वासनासाठी अडून मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे डॉक्टरांनो, तुम्हाला संरक्षण देऊ, पण समाजाला शिक्षा देऊ नका : मुख्यमंत्री मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवरअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement